JOIN US
मराठी बातम्या / देश / फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 3 महिलांसह 8 जण ठार; हॉटेलची इमारतही कोसळली

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 3 महिलांसह 8 जण ठार; हॉटेलची इमारतही कोसळली

कृष्णागिरी जिल्ह्यातील एका फटाक्यांच्या कारखान्यात ही दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही असं पोलिसांनी सांगितलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कृष्णागिरी, 29 जुलै : तामिळनाडुत पुन्हा एकदा फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. या स्फोटात तीन महिलांसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. कृष्णागिरी जिल्ह्यातील एका फटाक्यांच्या कारखान्यात ही दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही असं पोलिसांनी सांगितलं. शनिवारी सकाळी मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की बाजूची एका ह़ॉटेलची इमारतसुद्धा कोसळली. तर चार इतर इमारतींचे नुकसान झाले आहे. यामध्ये अनेक लोक अडकले. पोलिसांनी सांगितले की, आतापर्यंत गंभीर असलेल्या १२ जणांना रुग्णालयात दाखल केलं आहे. प्रयागराजमधील अजब घटना! 7 महिन्यांचं बाळ प्रेग्नंट; पोटातून काढलं 2 किलोचं दुसरं ‘बाळ’   दुर्घटनेनंतर तात्काळ घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. आगीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी अनेक तास प्रयत्न सुरू होते. यामध्ये अडकलेल्या लोकांची नेमकी संख्या अद्याप समजू शकलेली नाही.

संबंधित बातम्या

कृष्णगिरीचे पोलीस अधीक्षक सरोज कुमार ठाकोर यांनी सांगितले की, पझायापेट्टई भागात रवी नावाच्या व्यक्तीच्या फटाक्यांचा कारखान्यात स्फोट झाला. किमान सात लोकांचा मृत्यू झाला आहे. तर इतर काही जण जखमी आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस अधीक्षकांनी या दुर्घटनेतील मृतांच्या संख्येत वाढ होऊन ती ८ झाल्याचं सांगितलं. तर जखमींना उपचारासाठी कृष्णागिरी सरकारी मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल केलं असल्याची माहिती दिली. जिल्हाअधिकाऱ्यांनी सांगितलं की, स्फोटामुळे परिसर प्रचंड हादरला असून शेजारच्या हॉटेलची इमारत पूर्णपणे कसळली आहे. तीन चार घरांनाही याचा फटका बसला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या