नवी दिल्ली, 09 मे : पुलवामा हल्ल्यानंतर सरकारनं पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलली. त्यानंतर आता सिंधु जल कराराचा उल्लेख करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपला इशारा दिला आहे. ‘पाकिस्तान अद्याप देखील दहशतवाद पोसत आहे. पाकिस्ताननं दहशतवादाविरोधात कारवाई न केल्यास नद्यांचं पाणी भारत रोखेल. त्यावर भारत विचार करत असून रोखलेले पाणी हे हरियाणा, पंजाब आणि राजस्थानला वळवण्यात येईल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. सिंधु जल कराराप्रमाणे 3 नद्यांचं पाणी पाकिस्तानला जात आहे. आम्हाला ते पाणी रोखायचं नाही. दोन्ही देशांमध्ये शांततेच्या दृष्टीनं सिंधु जल करार करण्यात आला होता. पण, आता मैत्री संपुष्टात आलेली आहे. त्यामुळे आम्ही देखील या करारासाठी बांधिल नाहीत. असं गडकरी यांनी म्हटलं आहे.
‘भाजपला मिळणार 300 जागा’; ज्योतिष प्राध्यापकाची काँग्रेस सरकारकडून उचलबांगडी काय आहे सिंधू पाणी करार? 1960 साली झाला करार पंडित नेहरू आणि आयुब खान यांच्या सह्या भारत आणि पाकमध्ये पाणी वाटपाबाबतचा करार सिंधू नदीचं 80 टक्के पाणी पाकला मिळतं रावी, बियास आणि सतलज नद्यांवर पूर्णपणे भारताचा हक्क सिंधू, झेलम आणि चेनाबच्या पाण्यावर पाकचा हक्क 3 युद्ध झाली तरी हा करार मोडला नाही जगातला सर्वात यशस्वी पाणी करार पाकच्या पंजाब प्रांतासाठी सिंधूचं पाणी अतिशय महत्त्वाचं दिल्लीमध्ये छापा घातलेल्या रेव पार्टीची तयारी पाहून हैराण व्हाल तुम्ही! करार मोडण्याचे फायदे पाकला चांगलीच अद्दल घडेल भारत पाण्याचंही अस्त्र उगारू शकतो याची पाकला जाणीव होईल पाकच्या जनतेचा तिथल्या सरकारवर दबाव वाढेल पाककडे पाण्याचं अस्त्र नाही युद्ध लढण्यापेक्षा हा उपाय सोपा आणि स्वस्त करार मोडण्याचे तोटे करार मोडणं निसर्ग आणि मानवतेच्या विरोधात पंजाब आणि काश्मीरमध्ये पूर येऊ शकतो आंतरराष्ट्रीय समूदायाकडून भारतावर टीका होईल जगात भारताची विश्वसनीयता कमी होईल पाकला एकाकी पाडण्याच्या प्रक्रियेत अडथळे येतील बांगलादेश आणि भूतानसारखे देश अस्वस्थ होतील पुण्यात साडी सेंटरमध्ये अग्नितांडव, आगीची भीषणता दाखवणारा VIDEO