JOIN US
मराठी बातम्या / देश / इथे शिवलिंगावर पडतात उगवत्या आणि मावळत्या सूर्याची किरण, जाणून घ्या कुठे आहे हे अप्रतिम शिवमंदिर

इथे शिवलिंगावर पडतात उगवत्या आणि मावळत्या सूर्याची किरण, जाणून घ्या कुठे आहे हे अप्रतिम शिवमंदिर

रतनपूरमध्ये ऐतिहासिक सूर्येश्वर महादेव मंदिर असून येथील शिवलिंगावर उगवत्या सूर्याची पहिली किरण आणि मावळत्या सूर्याची किरण शिवलिंगावर पडतात.

जाहिरात

इथे शिवलिंगावर पडतात उगवत्या आणि मावळत्या सूर्याची किरण

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बिलासपूर, 9  जुलै : बिलासपूरच्या रतनपूर येथे एक असे अद्भुत शिवमंदिर आहे जिथे सकाळी उगवत्या सूर्याची पहिली किरण आणि मावळत्या सूर्याची किरण शिवलिंगावर पडतात. असे हे अद्भुत शिवमंदिर शेकडो वर्ष जुने आहे. रतनपूरला मंदिरांचा गढ असे म्हंटले जाते. इथे देवीच्या मंदिरांशिवाय अनेक धार्मिक स्थळ आहेत. येथे एक प्राचीन शिवमंदिर असून रतनपूरच्या महाकाय मंदिरापासून हे 2 किलोमीटर दूर आहे. या मंदिराला 20 दरवाजे असून हे शिव मंदिर अनेक गोष्टींमुळे खास आहे. यामंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याची पहिली किरण थेट मंदिरातील शिवलिंगावर पडते. तर सूर्य जेव्हा मावळतो तेव्हाही त्याची शेवटची किरण ही शिवलिंगावर पडतात. स्थानिक लोकांच्या सांगण्यानुसार हे मंदिर शेकडो वर्ष जुने आहे, परंतु आता प्रशासनाच्या अभावामुळे याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.

रतनपूरच्या ऐतिहासिक कृष्णाजुर्नी तलावच्याजवळ हे मंदिर असून हे सूर्येश्वर महादेव मंदिर अथवा 20 दारांचं मंदिर म्हणून देखील ओळखले जाते. येथे अशी मान्यता आहे की शिवलिंगवर पडणाऱ्या किरणांनी येथे वेळ निश्चित केली जाते. शिवरात्रीच्या काळात येथे भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या