JOIN US
मराठी बातम्या / देश / धक्कादायक! बंगळुरुतील IAS अधिकाऱ्याची आत्महत्या, राहत्या घरात घेतला गळफास

धक्कादायक! बंगळुरुतील IAS अधिकाऱ्याची आत्महत्या, राहत्या घरात घेतला गळफास

लॉकडाऊनच्या काळात अनेक आत्महत्याच्या घटना समोर आल्या आहेत. बंगळुरुतील हे अधिकारी नैराश्यात असल्याचे सांगितले जात आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बंगळुरु, 23 जून : देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊनचा कालावधीत अनेक आत्महत्या झाल्याची बाब समोर आली आहे. त्यातच बंगळुरुतून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. बंगळुरुतील IAS अधिकारी बीएम विजयाशंकर यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बंगळुरु येथील राहत्या घरी त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली. एक हजार कोटींच्या आयएमए आर्थिक फसवणुकीतील ते एक मुख्य आरोपी होते. 2019 मध्ये SIT ने त्यांना अटक केले होते. त्याशिवाय काही काळ ते तुरुंगातही होते. यावेळी चौकशीदरम्यान  विजयाशंकर यांच्याकडून 2.5 कोटी रुपये ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर जामिनावर त्यांची सुटका झाली होती. दरम्यान राज्यातील भाजप सरकारने पुढील चौकशी CBI कडे सोपवली होती. तुरुंगातून आल्यानंतर ते नैराश्यात असल्याची बाब काही जणांनी सांगितली आहे. ते आधी Karnataka Administrative Service (KAS) चे अधिकारी होते, त्यानंतर ते IAS झाले. घोटाळा उघड झाला तेव्हा ते Deputy Commissioner, Bengaluru Urban district पदावर होते. अधिकाऱ्याच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. हे वाचा-लॉकडाऊनमुळे गमावली शिक्षकाची नोकरी; उदरनिर्वाहासाठी आता डोसा विकण्याची वेळ देशात बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर देशातील अनेक भागातून आत्महत्याच्या घटना समोर येत आहेत. सुशांतही नैराश्यात होता, अशी माहिती चौकशीदरम्यान समोर आली आहे. संपादन - मीनल गांगुर्डे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या