नोकऱ्या ज्यांना समाजात मान पण पगार कमी
नवी दिल्ली, 28 जुलै : समाजाची घडी व्यवस्थित चालावी म्हणून माणसांनी विविध कामं वाटून घेतली आहेत. विविध कामं रोज केली जातात म्हणून आपलं सगळ्यांचंच जगणं सुरळीत होतं. अनेक पदांवर नोकरी करणाऱ्या उच्चपदस्थांबद्दल आपल्याला माहीत असतं, त्यांचं कामही माहीत असतं. प्रशासन, पोलीस, डॉक्टर, अंतराळवीर अशा अनेक नोकऱ्या असतात. अमेरिकेत अशा व्यवस्थांमध्ये काम करणाऱ्यांना समाजात मोठा आदर मिळतो, पण बरेचदा त्यांना पगार मात्र तेवढा मिळत नाही. अशाच काही नोकऱ्यांबद्दल ‘एमएसएन’ डॉट कॉमनं वृत्त दिलंय. अंतराळवीर, थेरेपिस्ट ही नोकरी करणाऱ्यांनी खूप प्रशिक्षण घेतलेलं असतं पण त्यांना सुरुवातीला मिळणारा पगार सहा अंकीही नसतो. काही नोकऱ्या मिळाल्या की भरपूर पगार मिळेल असं लोकांच्या मनात असतं जसं की वैद्यकीय किंवा कायदा क्षेत्रातील नोकरी. पण काही नोकऱ्यांमुळे समाजात आदर मिळतो पण त्यांना पगार फार नसतो, अशाच काही नोकऱ्यांबद्दल आपण जाणून घेऊयात.
1. फेडरल एअर मार्शल
जरी या नोकरीत ताऱ्यांपर्यंत पोहोचण्याची मजल मारण्याची संधी तुम्हाला मिळत असली तरीही त्यांच्या पगारांचा विचार करता ते जमिनीवर पाय ठेवायला लावणारेच असतात. नासामध्ये नागरिकांमधून निवडल्या गेलेल्या अंतराळवीराला (लष्कराकडूनही अंतराळवीर निवडले जातात.) अमेरिकी सरकारची GS-12 व GS-13 नोकरदारासाठीचं पे स्केल लागू होतं ज्यासाठी वार्षिक पॅकेज अनुक्रमे $71,099 व $84,546 अमेरिकी डॉलर्स असतं. शिक्षण आणि अनुभव याला अनुसरून पगार ठरतो.
या नोकरीसाठी उमेदवार अमेरिकी नागरिक असावा आणि त्याने मान्यताप्राप्त संस्थेतून स्टेम फिल्डमध्ये पदवी घेतलेली असावी त्याच बरोबर पदव्युत्तर स्वरूपाचा दोन वर्षांचा कामाचाअनुभव असावा. त्या उमेदवाराला नासाची दीर्घकालीन फ्लाईट अस्ट्रोनॉट फिजिकल परीक्षा उत्तीर्ण करावी लागते.
2. अंतराळवीर
एअर मार्शल हे अमेरिकेतील असे लॉ-एन्फोर्समेंट प्रोफेशनल्स आहेत ज्यांनी विमान उडवण्याचं प्राथमिक प्रशिक्षण घेतलेलं असतं आणि अत्यंत अचूकतेने त्यांचं काम करतात. देशातल्या व्यावसायिक एअरलाईन्सना काही धोका निर्माण झाल्यास विमानातील प्रवासी आणि क्रू मेंबर्सच्या सुरक्षिततेची जबाबदारी एअर मार्शल सांभाळतात. अमेरिकेतील गृह खात्याअंतर्गत असलेल्या ट्रान्सपोर्टेशन सिक्युरिटी अडमिनिस्ट्रेशनच्या (TSA) अखत्यारित एजन्सीअंतर्गत ते काम करतात.
लियाम निसन्सच्या “Non-Stop,” या चित्रपटामुळे एअर मार्शल पदाबद्दल जनसामान्यांत खूप क्रेझ आहे. TSA नुसार स्काय मार्शल्स अर्धा महिना म्हणजे वर्षाला 181 दिवसांत सुमारे 900 तास उड्डाण करतात.
करिअर लेव्हल 1, पे बँड G नुसार त्यांना वर्षाला सुरुवातीला $39,358 आणि सर्वाधिक $60,982 इतका पगार मिळतो. या पदासाठी उमेदवार हा 21 ते 36 वर्षांदरम्यानचा अमेरिकी नागरिक असावा तसंच पदवीधर आणि तीन वर्षांचा कामासंबंधी अनुभव असावा. उमेदवाराची पार्श्वभूमी तपासली जाते, लेखी परीक्षा, मुलाखत आणि मानसिक चाचणी घेतली जाते.
3. लेजिस्लेटर
लेजिस्लेटर म्हणजे लोकप्रतिनिधी, हा प्रतिनिधी समाजातील अनेक कामं करतो, नागरिकांशी संपर्क ठेवतो, त्यांच्या समस्या सोडवतो पण जेव्हा त्याला मिळणाऱ्या मोबदल्याचा विषय येतो तेव्हा अमेरिकेत तो खूपच कमी असल्याचं लक्षात येतं. इथे लोकप्रतिनिधी पूर्ण वेळ, अर्ध वेळ आणि हायब्रीड पोझिशन्सवरही काम करू शकतात.
National Conference of State Legislatures’ annual survey, 2022 च्या नुसार टेक्सासमधील रँकिंगनुसार हायब्रीड पोझिशनवर काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीला वर्षाला कमीतकमी $7,200 इतका पगार मिळतो.
अलास्कातील पूर्ण वेळ लेजिस्लेटर वर्षाला कमीतकमी $50,400 कमवतो तर विस्कॉन्सिनमध्ये तो $55,141इतका पगार घेतो. कॅलिफोर्नियातील लेजिस्लेटरला वर्षाला सर्वाधिक $119,702 पगार मिळतो.
4. एम्ब्लेमर
अमेरिकी सरकारच्या आरोग्य खात्याच्या नियमांनुसार सार्वजनिक सुरक्षिततेचं भान राखून मृतदेहांची अंत्यसंस्कारांसाठी तयारी करणाऱ्या व्यक्तींना एम्ब्लेमर म्हणतात. एखाद्या लहान मुलाचा मृत्यू, आत्महत्या किंवा खून अशा कुठल्याही पद्धतीने मृतदेह आला तरीही कितीही कठीण परिस्थितीत आपला शारीरिक कस राखणं तसंच मनावर संयम ठेवणं या गोष्टी त्यांना कराव्या लागतात. या कामाची गरज कधीही भासू शकते त्यामुळे त्यांना 24 तास सतर्क रहायला लागतं आणि नेहमीच्या नोकरीप्रमाणे कामाच्या ठराविक वेळा, सुट्टया या लागू होत नाहीत. एम्ब्लेमर्सच्या कामाचं स्वरूप पाहता त्यांना चांगला पगार असेल असं तुम्हाला वाटत असेल पण अमेरिकेतील ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्स नुसार 2022 मध्ये एम्ब्लेमरला $54,120 पगार किंवा दर तासाला $26 मानधन मिळतं.
एम्ब्लेमर होण्यासाठी उमेदवाराकडे मॉर्चरी सायन्सची पदवी, लायसन्स असणं गरजेचं आहे तसंच लायसन्ड फ्युनरल डिरेक्टरच्या मार्गदर्शनाखाली त्यानी अप्रेंटिसशिप केलेली असावी.
5. मॅरेज आणि फॅमिली थेरेपिस्ट
मॅरेज आणि फॅमिली थेरेपिस्ट हे लग्न किंवा कौटुंबिक समस्यांच्या संदर्भाने असणाऱ्या समस्या शोधणं त्या ट्रिट करणं असं काम करतात. यांना मानसिक, भावनिक आजारांसाठी थेरेपी द्यावी लागते. आकलन, परिणाम आणि वर्तणूक या विषयांसंबंधी अडचणी सोडवण्याचं काम हे थेरेपिस्ट करतात, असं US Bureau of Labor Statistics’ Occupational Employment and Wages च्या हँडबुकमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
या पदासाठी उमेदवाराने सायकॉलॉजीतील मास्टर्स डिग्री, मॅरेज अँड फॅमिली थेरेपी किंवा इतर मानसिक आरोग्यासंबंधी पदवी घेतलेली असावी. उमेदवाराकडे सरकारचं थेरेपिस्टचं लायसन्स असावं. ते मिळवण्यासाठी मास्टर्स डिग्री आणि त्यानंतर इंटर्नशीप अंतर्गत दोन ते चार हजार तास क्लिनिकल वर्क केलेलं असणं गरजेचं असतं. या उमेदवारांना सरकारी परीक्षा द्यावी लागते त्याचबरोबर वार्षिक कोर्सेसही करावे लागतात.
2022 मधील आकडेवारीनुसार या पदासाठी वार्षिक पगार $63,300, इतका होता तो दरतासाला $30.44 इतका होतो.
6. रिहॅबिलिटेशन काउन्सेलर
काउन्सेलर हा सामान्यपणे नागरिकांना शारीरिक, मानसिक आधार देणं त्यांच्या मानसिक कमतरतांतून बाहेर पडण्यासाठी त्यांना मदत करणं अशा स्वरूपाचं काम करतात.
रिहॅबिलिटेशन काउन्सेलर इतर प्रोफेशनल्सच्या सहाय्याने क्लायंटची प्रगती तपासणं, ट्रिटमेंटचा प्लॅन तयार करणं, करिअर ट्रेनिंग व इतर आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी मदत करतात. काउन्सेलर्स ज्येष्ठ नागरिक, मानसिक आजारी व्यक्ती, शिकण्यास अक्षम व्यक्ती, युद्धातील जायबंदी सैनिक यांच्यासोबत काम करतात.
या पदासाठी साधारणपणे मास्टर्स डिग्री घेतलेल्या व्यक्ती पात्र ठरतात. अमेरिकी शिक्षण मंत्रालयाच्या अंदाजाला अनुसरून मास्टर्स डिग्री घेण्यासाठी दरवर्षी
$30,000 फी भरावी लागते पण रिहॅबिलिटेशन काउन्सेलरला साधारणपणे $46,020 इतका पगार मिळतो जो दरतास $22.13 इतका होतो.
7 व 8. इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन आणि पॅरॅमेडिक्स
अगदी प्रथमोपचार करण्यापासून ते लाईफसेव्हिंग सपोर्ट देण्यापर्यंतची जबाबदारी इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियनला पार पाडावी लागते. कुठल्याही आपत्तीवेळी ते अग्रस्थानी असतात. अमेरिकी ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्सच्या आकडेवारीनुसार इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियनला साधारण वार्षिक पगार $40,120 इतका मिळतो जो दरतासाला $19.29 इतका होतो. पॅरॅमेडिक्सला वर्षाला सुमारे $53,560 इतका पगार मिळतो तो दरतासाला $25.75 इतका होतो.
टेक्निशियन होण्यासाठी दीडशे ते दोनशे तासांचं प्रशिक्षण घ्यावं लागतं. पॅरॅमेडिक्सचं ट्रेनिंग अधिक प्रगत असतं ज्यात पेशंटना IV लाइन्स लावून औषधं देण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. हे प्रशिक्षण 1200 ते 1800 तासांचं असतं.