नवी दिल्ली, 10 मे : देशभरात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांपासून पोलिसांनाही कोरोनाने विळखा घातला आहे. आता तर एअर इंडियाच्या (Air India) वैमानिकांनाही कोरोनाची लागण झाली आहे. एअर इंडियाच्या 5 वैमानिकांनां कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व मुंबईत राहणारे आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते कार्गो ऑपरेशनमध्ये काम करीत होते. आताच हे चीनमधून परतले होते. सांगितले जात आहे की हे वैमानिक चीनमध्ये ग्वांगझोऊसाठी कार्गो ऑपरेशन (मालवाहक उड्डाण) मध्ये काम करीत होते. या वैमानिकांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना ट्रेस करणे आणि तपासाचे काम सुरू झाले आहे. सध्या हे वैमानिक वैद्यकीय निरीक्षणाखाली आहे. यांच्या कुटुंबातील सदस्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.
सांगितले जात आहे की या वैमानिकांना 18 एप्रिल रोजी चीनमधील ग्वांगझोऊने उड्डाण केलं होतं. भारतात आल्यानंतर या वैमानिकांमध्ये कोरोनाची काही लक्षणं दिसून येत नव्हती. मात्र जेव्हा या वैमानिकांचा तपास करण्यात आला तेव्हा त्यांची कोरोना तपासणी पॉझिटिव्ह आली. ड्यूटीपूर्वी वैमानिकांचा तपास या 5 वैमानिकांचे एअर इंडियाच्या प्रोटोकॉलअंतर्गत परीक्षण करण्यात येते. या वैमानिकांची ड्यूटीवर परतण्याच्या 72 तासांपूर्वी तपासणी करण्यात येते. या तपासात 5 वैमानिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. सांगितले जात आहे की जेव्हा हे वैमानिक चीनहून परतले होते तेव्हा त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली नाहीत. खाजरी एअरलाइन्स प्रत्येक उड्डाणपूर्वी वैमानिकांचे परीक्षण करीत नाही. केवळ एअर इंडियाच अशी कंपनी आहे जी प्रत्येक उड्डाणपूर्वी आपल्या वैमानिकांची तपासणी करते. संबंधित- ‘मुस्लीम व्यक्ती पदार्थ तयार करत नाहीत’, वादग्रस्त जाहिरातीप्रकरणी मालकाला अटक