नवी दिल्ली : सोनिया गांधी यांना आता सून हवी आहे. राहुल यांचं लग्न करायचं असून अखेर त्यांनी त्याच्यासाठी मुलगी शोधायची जबाबदारी खास व्यक्तीकडे सोपवली आहे. हरियाणातील काही महिला शेतकऱ्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना राहुलच्या लग्नाबाबत विचारलं. त्यावर त्यांनी मुलगी शोधायची असल्याचे सांगितले. ‘राहुलचे लग्न करून द्या’ आणि प्रत्युत्तरात सोनिया गांधी यांनी आपल्या मुलासाठी ‘मुलगी शोधण्यास’ सांगितले. ’ महिलांनी सोनिया गांधी यांना सांगितलं की तुम्ही राहुल गांधी यांचं लग्न करुन द्या. राहुल गांधी म्हणाले की ‘असे’ होईल…’ यातील एका व्हिडिओमध्ये तो एका महिलेला खाऊ घालतानाही दिसत आहे.
दुसरीकडे, प्रियंका गांधी वड्रा यांनी महिलांना सांगितले की, ‘राहुल त्यांच्यापेक्षा जास्त खोडकर होता, मात्र त्यांना जास्त घरात ओरडलं जात होतं.’ विशेष म्हणजे, 8 जुलै रोजी राहुल गांधी अचानक सोनीपतमधील मदिना गावात थांबले. त्यांनी लोकांशी संवाद साधला आणि शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत वेळ घालवला. राहुल गांधी यांनी सोनीपत इथल्या महिलांना दिल्लीला घेऊन जाणार असं वाचन दिलं होतं. त्याने ते पूर्ण केलं आणि तिथल्या महिलांना दिल्लीला सोनिया गांधी यांच्यासोबत स्नेहभोजनासाठी नेलं. या सगळ्या महिलांना जेवण आणि मिठाई आवडली का असंही यावेळी राहुल गांधी यांनी महिलांना विचारलं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.