JOIN US
मराठी बातम्या / देश / रेल्वेत सगळी काळजी घेऊनही मुंबईहून जोधपूरला जाणारी तरुणी कोरोना पॉझिटीव्ह

रेल्वेत सगळी काळजी घेऊनही मुंबईहून जोधपूरला जाणारी तरुणी कोरोना पॉझिटीव्ह

18 मार्चला ती जोधपूरला पोहोचली. त्यानंतर 23 तारखेला तिला हलकासा ताप आला. त्यानंतर तिची टेस्ट करण्यात आली तेव्हा ती पॉझिटीव्ह निघाली.

जाहिरात

हे प्रमाण खाली येत असतांनाच काही गोष्टी चिंता करण्यासारख्या आहेत. काही राज्यांनी टेस्टिंग जास्तित जास्त कराव्यात असा सल्लाही आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 25 मार्च :  कोरोना देशात झपाट्याने पसरत आहे. सरकारकडून वारंवार प्रवास करू नका घरातच थांबा असं वारंवार सांगितलं जातेय. मात्र लोक त्याचं पालन करत नाहीत. याचे दुष्परिणाम आता दिसूनयेत आहेत. कोरनामुळे मुंबईहून जोधपूरला जाणाऱ्या एका तरुणीची कोरोन टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. 17 मार्चला ही तरुणी मुंबईवरून आपल्या गावी जात होती. घरी घेल्यानंतर काही दिवसांमध्ये तिला ताप आला. त्यानंतर तिची टेस्ट केली असता ती पॉझिटीव्ह आली असून तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने या तरुणीच्या पालकांनी तिला गावी बोलावून घेतलं. एसी फर्स्ट क्लासमध्ये या तरुणीचा बर्थ होता. त्यावेळी तिच्याच डब्यात एक जोडपं होत. ते तुर्कीहून परत आलं होतं. संपूर्ण प्रवासात आपण मास्क घातला होता. वारंवार हात सॅनिटाईज केले होते असं सांगितलं. 18 मार्चला ती जोधपूरला पोहोचली. त्यानंतर 23 तारखेला तिला हलकासा ताप आला. त्यानंतर तिची टेस्ट करण्यात आली तेव्हा ती पॉझिटीव्ह निघाली. त्यामुळे नागरीकांनी प्रवास टाळावा असं आवाहन सरकार आणि प्रशासनाकडून केलं जात आहे. वाचा -   LockDown मुळे घरी बसलेल्या लोकांसाठी… VIDEO Streaming साठी आता कमी डेटा लागणार कोरोना विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पुन्हा एकदा सावध केलंय. सर्व देश कोरोनाविरुद्ध युद्ध लढत असून देशावासियांनी त्यात सहभाग घेतला आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. मंगळवारी बोलताना त्यांनी देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. पंतप्रधानांनी आज पुन्हा एकदा लोकांना त्या 21 दिवसांची आठवण करून दिली आहे. आपण 21 दिवस जर घराबाहेर प़डलो नाही तरच आपण हे युद्ध जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. कोरोनाविरुद्ध लढण्याचा हाच एकमेव मंत्र असल्याचंही त्यांनी सांगितलं. घराच्या बाहेर पडलं तर जी परिस्थिती ओढवेल त्याचा विचारही आपल्याला करता येणार नाही असा इशाराही त्यांनी दिला होता. आज सलग दुसऱ्या दिवशी त्यांनी लोकांना त्या 21 दिवसांची आठवण करून देत घरीच थांबण्याची विनंती केली. वाचा -  कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स आणि नर्सेसना मिळणार 4 महिन्यांचा Advance पगार देशात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. देशातल्या सरकारी हॉस्पिटल्समधले सर्व डॉक्टर्स आणि नर्सेस सध्या या व्हायरसविरुद्ध लढत आहेत. कोरोना पेशंट्सवर उपचार करताना या डॉक्टर्स आणिन नर्सेसना आपला जीव धोक्यात घालावा लागतो. मात्र कर्तव्य असल्याने सर्व डॉक्टर्स प्रयत्नांची शर्थ करत आहेत. या पार्श्वभूमीवर ओरिसा सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. अशा सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना 4 महिन्यांचं वेतन Advance म्हणून देण्यात येणार आहे. असा निर्णय घेणारं ओरिसा हे पहिलच राज्य आहे. राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी ही घोषणा केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या