JOIN US
मराठी बातम्या / देश / 62 वर्षीय नाहरु खान यांनी 48 तासांत बनवलेली अत्याधुनिक सॅनिटायजेशन मशीन हॉस्पिटलला केली दान, CM नी केलं कौतुक

62 वर्षीय नाहरु खान यांनी 48 तासांत बनवलेली अत्याधुनिक सॅनिटायजेशन मशीन हॉस्पिटलला केली दान, CM नी केलं कौतुक

मानवतेचं कल्याण करण्यासाठी मनात भाव आणि इच्छाशक्ती असेल तर अशी निर्मिती आपोआप घडते

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भोपाळ, 5 एप्रिल : देशभरात कोरोनाचा (Coronavirus) कहर वाढत आहे. अशावेळी प्रत्येक भारतीय हे संकट लवकरात लवकर दूर व्हावं यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे. या लॉकडाऊनदरम्यान अनेक मदतीचे हात पुढे आले. देशातील प्रत्येक व्यक्ती या ना त्या प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे. यातच मध्यप्रदेशातील 62 वर्षीय नाहरू खान (Nahru Khan) यांनी अत्याधुनिक सॅनिटायजेशन मशिनची निर्मिती केली आहे. इतकंच नाही, विशेष म्हणजे त्यांनी केवळ 48 तासांत ही मशीन तयार केली आहे. याशिवाय कोरोनाच्या लढ्यात रुग्णालयात आपल्याकडून मदत म्हणून ही मशीन त्यांनी इंदिरा गांधी जिल्हा रुग्णालयाला दान देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर नाहरू खान म्हणाले, ‘मी यूट्यूब पाहून ही मशीन तब्बल 48 तासांत पूर्ण केली. या मशिनमुळे अनेकांना मोठी मदत मिळेल याची मला खात्री आहे’. नाहरू खान यांच्या या कार्याचं मोठं कौतुक केलं जात आहे. त्यांनी कोरोनाच्या लढ्याला पाठिंबा देत आपल्याकडून ही मदत केली आहे.

संबंधित बातम्या

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी नाहरु खान याचं कौतुक केलं आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांना नाहरु खान याच्या मदतीसाठी आभार व्यक्त केले आहे. शिवाय त्यांच्या कार्याला सलाम दिला आहे. शिवराज सिंह चौहान आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, ‘मानवतेचं कल्याण करण्यासाठी भाव आणि इच्छाशक्ती असेल तर अशी निर्मिती आपोआप घडते. नाहरू खान यांनी कोरोनाच्या लढ्यासाठी केलेल्या निर्मितीबद्दल मी आभार आहे आणि तुमच्या कार्याला माझा सलाम’. अत्याधुनिक सॅनिटायजेशन मशीन ही मशीन रुग्णालयाच्या प्रवेश द्वारावर लावण्यात आली असून आत जातानाच व्यक्तीचं पूर्ण शरीराचे सॅनिटायजेशन करता येणार आहे. संबंधित -  तबलिगीतील सहभागींनी शोधण्यासाठी पोलिसांची नवी क्लृप्ती, शब-ए-बारातची केली अपील

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या