JOIN US
मराठी बातम्या / देश / 'त्यांच्याकडे एकच 'नाथ', बाकी सगळे 'अनाथ''; महाराष्ट्रातील राजकारणावरुन या मुख्यमंत्र्याचा काँग्रेसला टोला

'त्यांच्याकडे एकच 'नाथ', बाकी सगळे 'अनाथ''; महाराष्ट्रातील राजकारणावरुन या मुख्यमंत्र्याचा काँग्रेसला टोला

शिवराज सिंह म्हणाले, की काँग्रेसही अतिशय अजब आहे. जो व्यक्ती स्वतःचं सरकार वाचवू शकला नाही (कमलनाथ), त्याला महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी पाठवलं होतं.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 01 जुलै : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 8 ते 10 दिवसांपासून प्रचंड हालचाली होत्या. गुरुवारी अखेर राज्यात नवं सरकार स्थापन झालं. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) म्हणून तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अनेक प्रयत्न करूनही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना राज्यातील महाविकास आघाडी सरकार वाचवता आलं नाही. यावरुनच आता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते शिवराज सिंह चौहान (Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan) यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. VIDEO: मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांनी ‘News18 लोकमत’वर पाहिला शपथविधी कार्यक्रम शिवराज सिंह म्हणाले, की काँग्रेसही अतिशय अजब आहे. जो व्यक्ती स्वतःचं सरकार वाचवू शकला नाही (कमलनाथ), त्याला महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी पाठवलं होतं. हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे असंच त्यांनीही केलं आणि बिचारे उद्धव ठाकरेही गेले. मला काँग्रेस आणि कमलनाथ दोघांच्याही विचाराची कीव येते. ना विकास करतात ना लोकांचं कल्याण करतात. काँग्रेसचे तर एकच नाथ आहेत, बाकी पूर्ण काँग्रेस अनाथ आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

संबंधित बातम्या

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गुरूवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि धर्मवीर आनंद दिघे (Aanand Dighe) यांना वंदन करुन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे हे राज्याचे 20 वे मुख्यमंत्री ठरले आहेत. मुंबईतील राजभवनात दरबार हॉलमध्ये हा शपथविधी कार्यक्रम अतिशय साध्या पद्धतीने पार पडला. एकनाथ शिंदे यंच्यासह देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं रात्री उशिरा गोव्यात जंगी स्वागत; आमदारांच्या जल्लोषाचा नवा VIDEO यानंतर एकनाथ शिंदे रात्री उशिरा गोवा येथील ताज हॉटेलमध्ये पोहोचले. यावेळी शिवसेना आणि अपक्ष समर्थक आमदारांच्यावतीने त्यांचं गोव्यात जंगी स्वागत करण्यात आलं. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन केलं. तर शिवसेनेच्या महिला आमदारांनी त्यांना ओवाळून त्यांचं स्वागत केलं. यावेळी आमदारांनी आपल्या हस्ते पेढा भरवत त्यांचं तोंड गोड केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या