मुंबई, 10 जुलै : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, याबाबत वारंवार सवाल उपस्थित केला जात आहे. सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार, शिंदे सरकारचा शपथविधी 13 जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. बंडखोर पुन्हा ठाकरेंकडे येण्याची शक्यता आहे. मात्र, यासाठी संजय राऊत यांची हकालपट्टी करण्याची मागणी माजी आमदाराने केली आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत (OBC Political Reservation) एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) परशुराम घाट (Parshuram Ghat) पुढील तीन दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी काही मिनिटांत वाचा. अखेर दिल्लीच्या बैठकीत ठरला फॉर्म्युला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, याबाबत वारंवार सवाल उपस्थित केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेआणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवा दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट (Amit Shah) घेतली. या भेटीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, आज शिंदे आणि फडणवीसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत काहीच माहिती दिली नव्हती. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. ‘संजय राऊतांना मातोश्रीने बाजुला करावं, विजय शिवतारेंचं मोठं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांनी पुकारलेल्या बंडामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं आहे. त्यामुळे मुख्य शिवसेनेत असलेल्या आमदार-खासदार आणि नेत्यांमध्ये बंडखोरांविरोधात रोष आहे. दुसरीकडे बंडखोरांच्या गोटातील आमदारांचा संजय राऊत यांच्याविरोधात रोष आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंसमोरील पहिलं आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. त्यापैकी पहिलं आव्हान हे कोल्हापूरातील आंदोलन असू शकतं. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी 13 जुलै रोजी आंदोलन पुकारलं आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. बंडखोर आमदार संजय राठोड यांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात क्लीन चिट शिवसेनेतून बंडखोरी करून बाहेर पडलेले संजय राठोड यांना क्लिन चिट मिळाल्याचं स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत मोठी बातमी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत (OBC Political Reservation) एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया समितीकडून इम्पिरिकल डेटा (Empirical Data) राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. बांठिया आयोगाकडून राज्याच्या मुख्य सचिवांकडे इम्पिरिकल डेटा सादर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. परशुराम घाट आणखी 3 दिवस बंद कोकणात (Konkan) गेल्या आठवड्यापासून प्रचंड पाऊस पडतोय. या पावसामुळे दरड कोसळल्याच्या (Landslide) घटना वारंवार समोर येत आहेत. विशेष म्हणजे दरड कोसळल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) परशुराम घाट (Parshuram Ghat) हा सध्या बंद आहे. परशुराम घाट काल पुन्हा सुरु होईल आणि त्या मार्गाने वाहतूक सुरु होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. पण मुसळधार पावसामुळे प्रशासनाने पुढचे आणखी तीन दिवस परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.