JOIN US
मराठी बातम्या / देश / दहशतवादी बुरहान वाणीमुळे रोखली गेली अमरनाथ यात्रा

दहशतवादी बुरहान वाणीमुळे रोखली गेली अमरनाथ यात्रा

बुरहान वाणीच्या खात्म्याला 3 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त घातपाताची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

श्रीनगर, 08 जुलै : दहशतवादी बुरहान वाणीच्या खात्म्याला तीन वर्षे होत आहेत. बुरहान वाणी हा हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर होता. त्याचा तीन वर्षापूर्वी भारतीय सैन्यानं खात्मा केला आहे. बुरहान वाणीच्या मृत्यूला 3 वर्षे होत असल्यानं सोमवारी काश्मीर घाटीमध्ये बंदचं आव्हान करण्यात आलं आहे. त्यामुळे घाटीमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. बुरहान वाणीचा खात्मा केल्यानंतर घाटीमध्ये मोठ्या प्रमाणात विरोध केला गेला होता. नागरिकांनी सैन्यावर दगडफेक केल्याच्या घटना देखील घडल्या. काही दिवस चाललेल्या या संघर्षामध्ये 85 लोक मारले गेले होते. दरम्यान, काश्मीर घाटीतील सध्याची परिस्थिती पाहता अनंतनाग, कुलगाम, पुलवामा जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे. यावरून घाटीमध्ये असलेल्या परिस्थितीचा अंदाज येतो. एक दिवसासाठी अमरनाथ यात्रा रोखली बुरहान वाणीच्या खात्माला तीन वर्षे झाली. त्यानिमित्त घाटीमध्ये बंदचं आव्हान करण्यात आलं आहे. सारी परिस्थिती पाहता आता अमरनाथ यात्रा एक दिवसाकरता रोखण्यात आली आहे. भाविकांना रामबन, उधमपूर, आणि जम्मूमध्ये रोखण्यात आलं आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्राची ताकद वाढली; आता 500 किमी अंतरावरील शत्रुचा होणार खात्मा सैन्यावर देखील बंदी जम्मू – काश्मीर पोलिसांच्या प्रवक्त्यानं देखील श्रीनगर – जम्मू राष्ट्रीय महामार्गावरून सैन्याला सोमवारी जाण्यास परवानगी नसल्याची माहिती दिली. बुरहान वाणीच्या खात्माला तीन वर्षे होत आहेत. त्यानिमित्त घातपाताची शक्यता लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. अनंतनागमध्ये भारतीय सैन्याशी उडालेल्या चकमकीत बुरहान वाणी 8 जुलै 2016 रोजी ठार झाला होता. दहशतवाद्यांना मोठा धक्का बुरहान वाणीचा खात्मा हा दहशतवाद्यांना मोठ धक्का होता. घाटीमध्ये दहशतवादी कारवाया वाढवण्यासाठी दहशतवादी बुरहान वाणी सारख्या दहशतवादाच्या शोधात आहेत. जम्मू – काश्मीरमध्ये दहशतवादांची घुसखोरी वाढत असून भारतीय लष्करानं आतापर्यंत शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. VIDEO : ‘माझ्या मुलाला वाचवा’, नारायण राणेंनी माझ्याकडे विनंती केली; पण…

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या