गांधीनगर, 29 फेब्रुवारी : गुजरातमध्ये (Gujrat) घोरपडीसारख्या दिसणाऱ्या प्राण्याची हत्या केली जात असल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. याला सांडा छिपकली (Monitor lizard) असं म्हटलं जातं. ज्याच्यापासून तेल काढून त्याची विक्री केली जाते आणि हे तेल काढण्यासाठीच त्याची हत्या केली जाते. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या भुज तालुक्यातील घासिया मैदानात अशा शेकडो प्राण्यांची हत्या करण्यात आल्याने एकच खबळळ माजली. कच्छ बन्नीच्या घसिया मैदानात या सांड्यांना त्यांच्या बिळातून बाहेर काढून मारलं जातं आहे, असा दावा प्रसारमाध्यमांशी बोलताना तिथल्या स्थानिकाने केला आहे. हेदेखील वाचा - गूड न्यूज ! आता स्त्रियांसाठीही आला Vigra; सुपरमॉडेलनं लाँच केला प्रोडक्ट सांडा हा घोरपडीसारखा दिसणारा प्राणी आहे, ज्याच्यात एक विशेष प्रकारचं तेल असतं. या तेलात एफ्रोडिसिया हा एक घटक असतो, जो खूप फायदेशीर ठरतो. हे तेल हाडांच्या समस्या आणि यौनशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर असतं, असं म्हटलं जातं. मात्र खरंच या तेलाचा काही फायदा आहे का? तर अजिबात नाही. तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, सांडा छिपकलीचं तेल वापरल्याने हाडांच्या समस्या दूर होतात, यौनशक्ती वाढते, असं म्हटलं जातं. मात्र त्यात काहीही तथ्य नाही. असं काहीच होत नाही. सांडा छिपकलीचं फॅट हे इतर प्राण्यांप्रमाणेच असते. सांडा छिपकलीचं तेल लावल्याने फायदा होण्याऐवजी त्याचे दुष्परिणामच होतात. हे तेल शरीराच्या ज्या भागावर लावलं आहे, तो भाग बर्न झाला. अशी अनेक प्रकरणं आम्ही पाहिलीत. त्यामुळे लोकांनी आपल्यातील कमतरता दूर करण्यासाठी असं तेल लावण्याऐवजी सायकोथेरेपी आणि योग्य ते उपचार करून घेणं योग्य ठरेल. हेदेखील वाचा - पहिल्यांदाच SEX; काय करावं सूचत नाही; मग या टीप्स रोमान्सचा आनंद करतील द्विगुणित