सेक्ससाठी दोघांचीही तयारी असावी - जेव्हा तुम्ही आणि तुमचा जोडीदार दोघंही सेक्ससाठी तयार असाल तेव्हाच सेक्स करा. जेणेकरून तुम्ही दोघंही याचा आनंद उपभोगू शकाल.
सेक्शुअल हायजिन - लैंगिक संबंध ठेवताना इन्फेक्शनचा धोका असतो. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं आहे ते सेक्शुअल हायजिन म्हणजेच लैंगिक स्वच्छता. सेक्स करण्याच्या आधी आणि सेक्स केल्यानंतर आपले गुप्तांग नीट स्वच्छ करा. फक्त सेक्स करायचं म्हणून नव्हे तर एरवीदेखील गुप्तांगाची स्वच्छता बाळगा. फक्त गुप्तांगच नव्हे तर हातही नीट स्वच्छ करायला हवेत.
सुरक्षित सेक्स – गरोदर राहण्याची भीती, इन्फेक्शनचा धोका किंवा इतर आजारांपासून वाचण्यासाठी कंडोम जरूर वापरा. शिवाय पहिल्यांदाच सेक्स करताना थोडा त्रास होईल त्यामुळे ल्यूब ट्युबही ठेवा.
संयम बाळगा - जोडीदारावर थेट सेक्ससाठी दबाव टाकू नका. सुरुवातील एकमेकांना समजून घ्या, प्रेमाने बोला. जोडीदारालाही सेक्ससाठी तयार करा. तो तयार असेल, तरच सेक्स करा. बळजबरीने सेक्स करू नका याचा नकारात्मक प्रभाव पडेल.
नकली ऑर्गेमज्म टाळा - जर सेक्समध्ये तुम्ही ऑर्गेज्म होत नसाल, तर फक्त जोडीदाराला खूश करण्यासाठी दिखावा करू नका. कारण नकली ऑर्गेज्म जास्त काळ टिकत नाही आणि भविष्यात तुमच्या नात्यात कटुता येऊ शकते.
या लेखात दिलेली माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे, न्यूज १८ लोकमत याची पुष्टी देत नाही. अंमलबजावणीसाठी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.