मनेर : काळ आणि वेळ कधी कशी येईल याचं उत्तर कुणी देऊ शकत नाही. अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या लोकांसोबत भयंकर घटना घडली आहे. त्यांचा हा प्रवासच शेवटचा असेल अशी कल्पनाही त्यांनी केली नसेल. अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत आतापर्यंत 15 जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. अंत्यसंस्कारासाठी ट्रॅक्टरमधून निघालेल्या लोकांचा अपघात झाला. नियंत्रण सुटलं आणि ट्रॅकटर दरीतून खाली कोसळला. यामध्ये 15 जण जखमी झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. हे सगळे लोक अंत्यसंस्कारासाठी गंगा घाटावर जात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन दरीत कोसळला. या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचं नाव प्रमोद कुमार आहे. काही दिवसांपूर्वी मनेर येथे दोन मोठे अपघात झाले होते. मणेर येथील गंगा नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. तर दुसरीकडे मणेरच्या खासपूर गावातही आग लागली आहे. या घटनेत तीन घरे जळून खाक झाली.