JOIN US
मराठी बातम्या / देश / 2014 नंतर पायाभूत सुविधांचा वेगाने विकास होतोय का? पाहा काय म्हणतात लोक

2014 नंतर पायाभूत सुविधांचा वेगाने विकास होतोय का? पाहा काय म्हणतात लोक

सामान्य जनतेला आपल्या देशातील विविध प्रश्नांविषयी काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी न्यूज18 नेटवर्क ग्रुपने पोल घेतले. यात लोकांनी काय म्हटले हे आपण जाणून घेऊया.

जाहिरात

रायझिंग इंडिया

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 13 एप्रिल : जागतिक स्तरावर भारताची मजबूत प्रतिमा सादर करण्यासाठी, देशातील सर्वात मोठा मीडिया समूह नेटवर्क 18 ने ‘रायझिंग इंडिया समिट’चं आयोजन केलं होतं. या परिषदेत केंद्र सरकारचे उच्चपदस्थ मंत्री, जागतिक दर्जाचे नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राजकारण, व्यवसाय आणि क्रीडा जगतातील अनेक दिग्गज सहभागी झाले होते. पंतप्रधान मोदींपासून ते निर्मला सीतारामनपर्यंत, यासोबतच अभिनेता मनोज वायपेयीपासून तर अभिनेत्री मृणाल ठाकूरपर्यंत अनेक दिग्गजांनी या कार्यक्रमात उपस्थिती लावली. याच कार्यक्रमा अंतर्गत न्यूज18 नेटवर्कने काही पोल घेतले होते. ज्यामध्ये देशासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले होते. याचा रिपोर्ट आता आलाय. यामध्ये सामान्य जनतेला आपल्या देशाच्या विकासाविषयी काय वाटतंय हे पाहायला मिळालंय. गेल्या दहा वर्षांमध्ये जगभराचा भारताबद्दलचा दृष्टीकोण सुधारला आहे का? असा प्रश्न या पोलमधून विचारण्यात आला होता. याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. यामध्ये 75% लोकांनी सकारात्मक उत्तर दिलंय. म्हणजेच जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोण सुधारला आहे असं त्याचं मत आहे. तर उर्वरीत 25 टक्के लोकांना असं वाटत नाही.

गेल्या दशकामध्ये भारतातील व्यवसायाचे वातावरण सुधारले आहे का? असा प्रश्न देखील पोलमध्ये विचारण्यात आला होता. यामध्ये 58% लोकांच म्हणणं आहे की, देशातील व्यवसायाचे वातावरणं बदलले आहे.

संबंधित बातम्या

2014 पासून पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गती कमालीची वाढली आहे असं तुम्हाला वाटतं का? या प्रश्नाच्या उत्तराला देखील लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यामध्ये 85% लोकांना वाटतं की, देशभरात 2014 नंतर पायाभूत सुविधांमध्ये झपाट्याने विकास होत आहे. पूर्वीपेक्षा या विकासाची गती वाढली आहे. तर 15 टक्के लोकांना ही गती वाढलेली नाही असं वाटतंय.

जाहिरात

रायझिंग इंडिया या कार्यक्रमात देशभरातील दिग्गजांनी आपलं मतं व्यक्त केलं. देशाचा सुरु असलेला विकास यासोबतच त्यांच्या आयुष्यातील प्रसंग अशा अनेक विषयांवर त्यांनी दिलखुलासपणे बातचित केली. एवढंच नाही तर या कार्यक्रमांच्या माध्यमातून अनेकांचे सत्कारही करण्यात आले. समाजातील शिक्षण, कला, राजकारण, समाजकारण या क्षेत्रांमध्ये विविध काम करणाऱ्या आणि आपलं महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या लोकांचा न्यूज 18 नेटवर्कच्या वतीने सत्कार करण्यात आला. न्यूज18 रायझिंग इंडिया हा कार्यक्रम पूनावाला फिनकॉर्पने हिंदुस्तान टाइम्सच्या पार्टनरशिपसह RIL, डिजिटल पार्टनर हॅवेल्स आणि सोशल इनोव्हेशन पार्टनर M3M फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सादर केला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या