JOIN US
मराठी बातम्या / देश / वर्षात 30 ते 40 कोटी कमवतो रेडा, मालकाने त्याच्या अंघोळीसाठी बांधलाय चक्क स्विमिंग पूल

वर्षात 30 ते 40 कोटी कमवतो रेडा, मालकाने त्याच्या अंघोळीसाठी बांधलाय चक्क स्विमिंग पूल

भारतात पाळीव प्राण्यांच्या अनेक प्रजाती आढळतात, त्यातील काही प्रजाती खूपच महाग असतात. सध्या एका रेड्याच्या किमतीची उत्तर प्रदेशमध्ये चांगलीच चर्चा होत आहे.

जाहिरात

व्हायरल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 8 एप्रिल: भारतात पाळीव प्राण्यांच्या अनेक प्रजाती आढळतात, त्यातील काही प्रजाती खूपच महाग असतात. सध्या एका रेड्याच्या किमतीची उत्तर प्रदेशमध्ये चांगलीच चर्चा होत आहे. ही किंमत ऐकून तुम्ही चकित झाल्याशिवाय राहणार नाही. एका रेड्याची किंमत कोट्यवधी रुपये आहे, असं सांगितल्यास तुम्हाला विश्वास बसेल का? नक्कीच बसणार नाही. पण एका रेड्याची किंमत खरोखर 10 कोटी रुपये आहे. रेड्याच्या किमतीचा एवढा मोठा आकडा ऐकल्यावर तुम्हाला थोडं विचित्र वाटेल, पण सध्या उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये या रेड्याची जोरदार चर्चा आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या कृषी व पशु मेळाव्यात देशातील विविध राज्यांतील शेतकरी आपली जनावरं घेऊन पोहोचत आहेत. इथे पोहोचलेल्या या प्राण्यांच्या गर्दीत हरियाणातून आलेला घोलू 2 नावाचा रेडा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. त्याचं कारण म्हणजे या घोलू 2 नावाच्या रेड्याची किंमत 10 कोटी रुपये ठरवण्यात आली आहे. या रेड्याची उंची 5 फूट 7 इंच आहे.

घोलू 2 चे मालक हरियाणा येथील पानिपतचे रहिवासी नरेंद्र सिंह आहेत. तेच हा रेडा घेऊन इथे पोहोचले आहेत. त्यांच्या मते, घोलू 2 च्या आईचे नाव राणी आणि वडिलांचे नाव पीसी 483 आहे आणि आजोबांचं नाव घोलू आहे. घोलू 2 चे आजोबा घोलू 11 वर्षांपर्यंत नॅशनल चॅम्पियन होते, तर घोलू 2 ने 6 वेळा नॅशनल चॅम्पियनशिपदेखील जिंकली आहे. अलीकडेच, 13 मार्च रोजी हरियाणामधील दादरी इथे झालेल्या स्टेज शोमध्ये घोलू 2 ने 5 लाख रुपये बक्षीस असलेला ‘द बेस्ट अॅनिमल ऑफ द शो’ हा किताब पटकावला आहे. नरेंद्र यांच्या म्हणण्यानुसार, घोलू 2 दिवसात 30 किलो हिरवा कोरडा चारा आणि 10 किलो हरभरा खातो, त्याच्या खुराकाची किंमत महिन्याला सुमारे 30,000 रुपये आहे. हेही वाचा -  19 व्या मजल्यावरुन पडली व्यक्ती; उठून करायला लागली असं काही…Video व्हायरल घोलू 2 एका वर्षात मालकाला 30 ते 40 कोटी रुपये कमवून देतो. नरेंद्र यांच्या म्हणण्यानुसार, अनेक एजन्सींनी त्याची किंमत 10 कोटी ठेवली आहे, परंतु आम्हाला त्याला विकायचं नाही, कारण त्यातून आम्हाला 30 ते 40 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळत आहे. देशात याच्या स्पर्म्सना इतकी मागणी आहे की, त्यातून जन्माला येणारी पिल्लं खूप चांगली आहेत. त्याची उंची 5 फूट 7 इंच आणि लांबी 14 फूट आणि वजन 16 क्विंटल आहे. मागील वर्षी झालेल्या सर्व प्रदर्शनांमध्ये तो पहिला आला आहे आणि चॅम्पियन झाला आहे. आमचं संपूर्ण कुटुंब या रेड्याच्या सेवेत हजर असतं. तसेच त्यासाठी चार ते पाच नोकरही आहेत. 24 तासांत तीन ते चार ठिकाणी त्याची जागा बदलली जाते आणि त्याच्या आंघोळीसाठी स्विमिंग पूलसारख्या सुविधाही आहेत, असं नरेंद्र यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या