JOIN US
मराठी बातम्या / देश / कर्नाटकातील आमदारांच्या राजीनाम्याचं हे आहे सिक्रेट!

कर्नाटकातील आमदारांच्या राजीनाम्याचं हे आहे सिक्रेट!

नेतृत्वावर असलेली नाराजी हे कर्नाटकातील आमदारांच्या राजीनाम्याचं एक कारण असल्याचं मानलं जात आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बंगळूरू, 08 जुलै : कर्नाटकातील 13 आमदारांनी राजीनामा दिला आणि काँग्रेस – जेडीएसचं सरकार अल्पमतात आलं. या आमदारांच्या मनधरणीचा पूर्ण प्रयत्न काँग्रेस, जेडीएसनं केले. पण, त्याला यश आलं नाही. मंत्रिपद, मतदारसंघाला जास्त निधी देण्याचं वचन देखील या आमदारांना दिलं गेलं. पण, त्यानंतर देखील आमदार आपल्या राजीनाम्यावर ठाम आहेत. आमदारांच्या राजीनाम्याला आता अनेक कारणं आहेत. दरम्यान, एका अपक्ष आमदारानं देखील राजीनामा देत भाजपला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं. कुमारस्वामी यांची खुर्ची धोक्यात आली असतानाच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडत आहेत. काँग्रेसचे दिग्गज नेते डी. के. शिवकुमार यांनी भाजप आमदारांचं अपहरण करत असल्याचा आरोप केलाय. ते म्हणाले, मंत्रिपदाचा राजीनामा दिलेले अपक्ष आमदार नागेश यांना फोन केला असता त्यांनी सांगितले की भाजपचे नेते येदियुरप्पा यांच्या पीएने आपलं अपहरण केलं. नागेश यांना खास विमानाने अज्ञात स्थळी नेण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. ‘देशात 30 टक्के बोगस लायसन्स; पण आम्ही काहीच करू शकत नाहीत’ कमजोर नेतृत्व कुमारस्वामी अमेरिका दौऱ्यावर असताना राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी आमदारांना हाताळण्यासाठी सक्षम असं नेतृत्व नाही. याचा फायदा घेत या आमदारांनी राजीनामा दिला. उपमुख्यमंत्र्यांवर नाराजी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांच्यावर देखील या आमदारांची नाराजी दिसत आहे. जी. परमेश्वर यांच्याशी या आमदारांचे मतभेद होते अशी माहिती देखील आता समोर येत आहे. हायकोर्टानं स्वत:लाच ठोठावला एक लाखांचा दंड; जाणून घ्या कारण जनतेचा विश्वास जिंकण्यात अयशस्वी जनतेचा आता जेडीएसवर विश्वास नसल्याचं एच विश्वनाथ या आमदारानं news18शी बोलताना सांगितलं. लोकसभेतील पराभवानंतर देखील देवेगौडा परिवाराला त्याबद्दल काहीच वाटत नसल्याचं एच विश्वनाथ यांनी सांगितलं. भाजपचं Wait And Watch वर्षभरात भाजपनं सहा वेळा सत्तांतर करण्याचा प्रयत्न केला. पण, भाजपला त्यामध्ये यश मिळालं नाही. त्यामुळे यावेळी मात्र भाजप Wait And Watchच्या स्थितीत आहे. VIDEO: वारकऱ्यांसाठी नवनीत राणांकडून स्पेशल ट्रेन, पावसासाठी विठुरायाकडे साकडं

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या