पतीनं दिले 7 पोती 'चिल्लर'
जयपूर : हुंड्यासाठी छळ करणाऱ्या पतीला बायकोनं कोर्टात खेचलं. पतीला न्यायालयानं पत्नीला पोटगी द्यायला लावली त्या बदल्यात न्यायालयात जे घडलं ते जज आणि वकील पाहातच राहीले. असं पहिल्यांदाज बहुतेक घडलं असावं, सगळी परिस्थिती पाहता ते तोंडात बोटं घालायचेच बाकी होते अशी अवस्था होती. जयपूरच्या फॅमिली कोर्टाची लिंक असलेल्या एडीजे कोर्टात एक धक्कादायक प्रकरण समोर आलं. हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपी पतीला तुरुंगात पाठवण्याचा निर्णय दिला. तर पत्नीला तिचं जीवनावश्यक वस्तूंची गरज भागवण्यासाठी थकीत रक्कम 55 हजार रुपये पत्नीला देण्याचे आदेश दिले. त्यावर आरोपीच्या नातेवाइकांनीही रक्कम जमा करून घेतली, मात्र ५५ हजारांची रक्कम पाहून थक्क झाले. ही रक्कम नोटा किंवा चेकमध्ये नव्हती तर एक दोन रुपयांची नाणी होती. एक पोती नाही बरं का तर तब्बल 7 पोती नाणी जमा करुन नातेवाईकांनी त्यांच्या सूनेसमोर ठेवले. हा सगळा प्रकार पाहून कोर्टात उपस्थित असलेले लोक हैराण झाले. कौटुंबिक वादामुळे पतीने देखभालीची थकबाकी म्हणून 55,000 रुपये रोख रक्कम जमा केली. या नाण्यांचे वजन साधरणपणे 280 किलो होतं. त्यामुळेच त्यांना बॅगेत भरून न्यायालयात आणावं लागलं. डब्यांमधून नाण्यांचा आवाज ऐकू आल्याने सर्वांनाच धक्का बसला. सर्व पिशव्या 1, 2, 5 आणि 10 रुपयांच्या नाण्यांनी भरल्या होत्या. यानंतर न्यायालयाने नाणी सुरक्षित ठेवण्याच्या सूचना दिल्या. 55,000 रुपयांची नाणी दिल्यावर पत्नी सीमा कुमावत यांचे वकील रामप्रकाश कुमावत म्हणाले की, तिला त्रास देण्यासाठी हे केलं जात आहे, जे अमानवीय आहे. तर दुसरीकडे पतीच्या वतीने अधिवक्ता रमन गुप्ता यांनी 55 हजार रुपयांची नाणी भारतीय चलनाची वैध असल्याचे सांगून रक्कम स्वीकारण्याची विनंती केली. इतकी नाणी पाहून न्यायालयाने ही रक्कम मोजण्यासाठी 10 दिवस लागतील असेही सांगितले. आता इतकी नाणी मोजायची कशी आणि कधी? यासाठी न्यायालयाने पतीला ही सर्व नाणी प्रत्येकी एक हजार रुपयांच्या पिशवीत आणून मोजण्याचे आदेश दिले. नाण्यांच्या योग्य मोजणीसाठी 26 जून ही तारीखही निश्चित करण्यात आली आहे.