नवी दिल्ली, 8 जुलै : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे पराभवानंतर पहिल्यांदाच अमेठीला जाणार आहेत. आता ते काँग्रेसचे अध्यक्षही नाहीत आणि अमेठीचे खासदारही नाहीत पण काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी ते अमेठीला जाणार, अशी माहिती आहे. याआधी राहुल गांधी 3 वेळा अमेठीचे खासदार राहिले आहेत. या 15 वर्षांच्या कारकिर्दीनंतर आता मात्र ते एक सामान्य नेते म्हणून अमेठीला जातील. त्यांचा हा अमेठी दौरा १० जुलैला होणार आहे. बालेकिल्ला उद्ध्वस्त अमेठीला आतापर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होतं. इथे काँग्रेसची चांगली ताकद असतानाही या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा पराभव केला. त्यांनी राहुल गांधींपेक्षा 55 हजार जास्त मतं मिळवत काँग्रेसचा हा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष कोण याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. त्यातच राहुल गांधी पराभवानंतर दीड महिन्यांनी अमेठीचा दौरा करत आहेत. सेवादलाची महत्त्वाची बैठक उत्तर प्रदेशमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लखनौमध्ये सेवादलाची महत्त्वाची बैठक झाली. त्यात राहुल गांधींनाच काँग्रेस अध्यक्ष बनवलं जावं, असा आग्रह सेवादलाच्या नेत्यांनी धरला. पण आता मात्र काँग्रेसचं अध्यक्षपद दुसऱ्या कुणाला तरी मिळू शकतं. VIDEO : ‘माझ्या मुलाला वाचवा’, नारायण राणेंनी माझ्याकडे विनंती केली; पण… काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होत असताना कर्नाटकमध्येही काँग्रेस आणि जेडीएस सरकारवर संकट आलं आहे.या सगळ्या घडामोडी पाहता उत्तर प्रदेशच नाही तर पूर्ण देशभरात काँग्रेसने पक्षाची पुनर्रचना करण्याचं आव्हान पक्षाच्या नेत्यांसमोर आहे. अशा परिस्थितीत राहुल गांधी हे काँग्रेसचे एक नेते म्हणून काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांंचं लक्ष आहे. =============================================================================================== VIDEO: निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, राज ठाकरे दिल्ली दरबारी