चंदिगढ, 15 जानेवारी : घरी लग्नाची तयारी सुरु असताना तीन दिवस आधी मुलीवर डिझेल ओतून पेटवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात आनंदाचं वातावरण असताना घडलेल्या या घटनेमुळे दोन्ही कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. दोन अज्ञात व्यक्ती चेहऱ्याला कापड बांधून घरात घुसल्या आणि त्यांनी मुलीच्या अंगावर डिझेल ओतलं आणि आग लावली. यामध्ये मुलगी 90 टक्के भाजली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लुधियानातील हजिंदर सिंग यांच्या मुलीचे 17 जानेवारीला लग्न होणार होते. त्याची तयारी घरी सुरू असतानाच मुलीवर डिझेल ओतून आग लावली. यात ती 90 टक्के भाजली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी आतापर्यंत कोणतीही तक्रार, गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लुधियानातील विश्वकर्मा परिसरारत राहणाऱ्या हजिंदर सिंग यांच्या मुलीचे लग्न 17 जानेवारीला होणार होते. पण मंगळवारी अचानक मुलगी ओरडल्याचा आवाज झाला. घरचे लोक तिच्याकडे धावले तेव्हा ती व़ॉशरूममध्ये गेली होती. तिच्या शरीराला लागलेली आग विझवल्यानंतर तिला दयानंद मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. या गडबडीत घरातून दोन चेहरा झाकलेल्या लोकांना पळून जाताना पाहण्यात आलं. वाचा : TV शोमध्ये आरोपीने मर्डरचा गुन्हा केला मान्य, पोलिसांनी स्टुडिओतूनच केली अटक पोलिसांनी सांगितलं की, सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर घरात कोणी शिरल्याचं दिसलं नाही. मुलगी 90 टक्के भाजली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या तिच्याशी बोलणं कठिण आहे आणि तिच्या कुटुंबियांची साक्ष घेतलेली नाही. मानेला गुंडाळला गेला ‘चायनीज’ मांजा, सात वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू