नवी दिल्ली, 12 एप्रिल : पंजाबच्या बठिंडा इथं मिलिट्री स्टेशनमध्ये अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली आहे. यामध्ये चार जवान शहीद झाल्याचं वृत्त समोर येतंय. बुधवारी पहाटे साडे चार वाजता ही घटना घडली. गोळीबाराचे कारण अद्याप समोर आलेलं नाही. गोळीबाराची घटना घडल्यानंतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. गोळीबार कुणी आणि का केला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
‘या’ भारतीय ट्रेनमध्ये 75 वर्षांपासून फ्रीमध्ये प्रवास करताय लोक! नेमकं प्रकरण काय? अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबाराची घटना पहाटे चार वाजून ३५ मिनिटांनी घडली. यानंतर परिसरात तात्काळ लष्कराचं पथक शोध घेत असून संपूर्ण परिसरात घेराव घालण्यात आला आहे. सध्या शोध मोहिम सुरू आहे. भटिंडा मिलिट्री स्टेशन शहराला लागून आहे. सर्वाज जुनं आणि मोठं मिलिट्री स्टेशन आहे. स्टेशन बाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात आहे. तर गोळीबाराची घटना ऑफिसर मेसमध्ये झाली आहे. मिलिट्री स्टेशनमध्ये गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये ८० मीडियम रेजिमेंटच्या जवानांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी युनिट गार्डच्या रूममधून एक इन्सास एसॉल्ट रायफल बेपत्ता झाली होती. गोळीबार करणारी व्यक्ती साध्या कपड्यांमध्ये होती. बेपत्ता शस्त्राचा शोध घेतला जात आहे.