बेंगळुरू, 19 एप्रिल : देशात लॉकडाऊनमुळे नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही. अत्यावश्यक सेवा उपलब्ध असल्या तरी अनेकदा त्यातही अडचणी येतात. कर्नाटकात बेंगळुरूमध्ये अॅम्बुलन्स न मिळाल्यानं गर्भवती महिलेला 7 किलोमीटरप्रयंत चालावं लागलं. यामुळे तिची प्रकृती बिघडल्यानं वाटेतच असलेल्या एका डेंटल क्लिनिकमध्ये प्रसूती करण्यात आली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, कर्नाटकातील बेंगळुरूत राहणाऱ्या गर्भवती महिलेला रविवारी प्रसूती वेदना सुरू झाल्या. यावेळी तिला रुग्णालयात जाण्यासाठी अॅम्बुलन्स मिळाली नाही. तेव्हा ती चालत दवाखान्यात जाण्यास निघाली. जवळपास 7 किमी अंतर चालल्यानंतर तिला अस्वस्थ वाटायला लागलं. वाटेतच असलेल्या एका क्लिनिकमध्ये महिला थांबली. तिथं डेंटिस्ट डॉ. रम्या यांनी महिलेची प्रसूती केली.
डॉक्टर रम्या यांनी सांगिलं की, महिला चालत त्यांच्या क्लिनिकमध्ये पोहोचली होती. पतिसोबत महिला आली आणि क्लिनिकमध्येच तिची प्रसूती झाली. मुलाच्या जन्मानंतर काही वेळ बाळाची हालचाल दिसत नव्हती तेव्हा आम्ही सगळेच घाबरलो होते. पण त्याला नंतर रिकव्हर कऱण्यात आलं आणि जीव भांड्यात पडला.
महिलेची सुखरूप प्रसूती झाल्यानंतर थोड्यावेळाने आई आणि बाळा दोघांनाही जवळच्याच रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं. सध्या दोघांची प्रकृत्ती उत्तम असून त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आल्याची माहिती रम्या यांनी दिली. हे वाचा : लॉकडाऊनमध्ये करायचं काय? शेतकरी दाम्पत्याने अंगणातच खोदली विहीर संपादन - सूरज यादव