JOIN US
मराठी बातम्या / देश / प्रशांत किशोरवर पॉलिटिकल कॅम्पेनची नक्कल केल्याचा आरोप, पोलिसात तक्रार

प्रशांत किशोरवर पॉलिटिकल कॅम्पेनची नक्कल केल्याचा आरोप, पोलिसात तक्रार

प्रशांत किशोर यांच्यावर ‘बात बिहार की’ या आशयाची नक्कल केल्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पटना, 27 फेब्रुवारी : पाटलिपूत्र ठाण्यात राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) विरोधात पोलिसाना तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार मोतिहारी येथे राहणाऱ्या शाश्वत गौतम नावाच्या युवकाने केली आहे. प्रशांत किशोर यांच्यावर ‘बात बिहार की’ या आशयाची नक्कल केल्या आरोप लावण्यात आला आहे. या तक्रारीत आसोमा नावाच्या एका तरुणाचेदेखील नाव आहे. शाश्वत यांनी यापूर्वी निवडणुकांमध्ये कॉंग्रेससाठी काम केले आहे. शाश्वत यांनी ‘बिहार की बात’ नावाचा एक प्रोजेक्ट बनविला होता. येत्या दिवसांत हा प्रोजेक्ट लॉन्च करण्यात येणार होता. यादरम्यान ओसामाने शाश्वतच्या कंपनीतून राजीनामा दिला आणि ‘बिहार की बात’मधील सारा कंटेट त्याने प्रशांत किशोरला दिल्याचा आरोप लावण्यात आला आहे. नितीश कुमार यांच्या पार्टीचा भाग असलेले प्रशांत किशोर वेगळे झाले आहेत. ते आता बिहारमध्ये राजकीय कार्यकर्ता म्हणून काम करण्याची चर्चा आहे. यापूर्वी त्यांनी अनेक निवडणुकांमध्ये विविध पक्षांसोबत काम केले आहे. किशोर यांनी राज्यातील युवकांना जोडण्यासाठी ‘बात बिहार की’ नावाचा कॅम्पेन सुरू केला आहे. किशोर या कॅम्पेनच्या माध्यमातून तब्बल 10 लाख युवकांना जोडणार आहे. नोंदणीची झाली सुरुवात निवडणुकांचे रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या ‘बात बिहार की’ (Prashant Kishors Baat Bihar ki) या कार्यक्रमाची नोंदणी सुरू झाली आहे. जे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून समान विचारधारा असलेल्या लोकांचा गट तयार करू इच्छित आहेत. याबरोबरच पटानामध्येही अनेक महत्त्वाचे कार्यक्रम प्रस्तावित आहेत. हेही वाचा - दिल्ली हिंसाचारात 34 जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 6 वायरलेस मॅसेजकडे दुर्लक्ष

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या