JOIN US
मराठी बातम्या / देश / बहिणीच्या वरातीआधी निघाली भावाची अंत्ययात्रा, संपूर्ण गावाला अश्रू अनावर

बहिणीच्या वरातीआधी निघाली भावाची अंत्ययात्रा, संपूर्ण गावाला अश्रू अनावर

आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलं नाही पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अरवल, 18 जून : बहिणीच्या लग्नाची वरात निघण्याआधीच भावाच्या मृत्यूच्या बातमीनं गाव हारदलं. ही घटना आहे बिहारच्या दरभंगा इथली. SSP चे रक्षक म्हणून तैनात असलेल्या चिंटू पासवान यांनी आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली. चिंटू पासवान यांनी स्वयंचलित शस्रानं गोळी झाडून घेत स्वत:चं आयुष्य संपवलं. धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या बहिणीचं लग्न होणार होतं. त्याच दरम्यान हा प्रकार घडल्यानं गावावर शोककळा पसरली आहे. 20 जूनला बहिणीचं लग्न असल्यानं घरात लगीनसराईची तयारी सुरू होती. त्याआधीच भावाचा मृत्यू झाल्याचं कळताच कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. चिंटू पासवान यांच्या पार्थिवावर पुनपुन नदीवरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलं नाही पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू आहे. हे वाचा- चीनला धडा शिकवण्यासाठी भारताची तयारी, सीमारेषेवर हालचालींना वेग दुसरीकडे चिनी सैन्याकडून देशाच्या बचावादरम्यान शहीद जवान जवान सुनील कुमार यांचं पार्थिव बुधवारी संध्याकाळी साडेसहा वाजता पटना विमानतळावर पोहोचले. बिहटाच्या सिकेरिया पंचायतीच्या तारानगर गावात राहणाऱ्या 38 वर्षीय जंबाज सुनील यांचं पार्थिव आणण्यात आलं. शहीद जवान सुनील कुमार यांनी गावातील लोकांसह नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. हे वाचा- चीनचा सूर बदलला; सीमेवरची परिस्थिती नियंत्रणात पण सैनिकांच्या मृत्यूबद्दल मौन हे वाचा- भारत चीन : दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची संघर्षानंतर प्रथमच फोनवर चर्चा संपादन- क्रांती कानेटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या