JOIN US
मराठी बातम्या / देश / देशावासियांशी 'मन की बात' प्रेरणादायी, 99 व्या एपिसोडमध्ये PM मोदींनी साधला संवाद

देशावासियांशी 'मन की बात' प्रेरणादायी, 99 व्या एपिसोडमध्ये PM मोदींनी साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. मन की बातचा हा ९९ वा एपिसोड होता.

जाहिरात

मन की बात

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली, 26 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. मन की बातचा हा ९९ वा एपिसोड होता. याच्या पहिल्या एपिसोडचे प्रसारण ३ ऑक्टोबर २०१४ रोजी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या ९९ व्या एपिसोडमध्ये बोलताना म्हटलं की, माझ्या प्रिय देशवासियांनो मन की बातमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज संवाद सुरू करताना मनात अनेक भावना आहेत. मन की बात सोबतचा हा प्रवास ९९ व्या पायरीवर पोहोचला आहे. पंतप्रधान मोदींनी मन की बात च्या एपिसोडबद्ल बोलताना म्हटलं की, अनेक लोक असतात जे मुलींच्या शिक्षणासाठी आपली पूर्ण कमाई लावतात. कोणी आपल्या आयुष्याची कमाई पर्यावरण आणि लोकांच्या सेवेसाठी समर्पित करतात. माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बातमध्ये आपण अशा हजारो लोकांची चर्चा केली जे इतरांच्या सेवेसाठी आपलं आयुष्य वाहून घेत आहेत. जिथं भारतातल्या लोकांच्या मनातली गोष्ट असते तिथे मिळणारी प्रेरणा खूप वेगळी असते. हवा निघाली का? म्हणत राहुल गांधी पत्रकारावर भडकले; म्हणाले, चांगले प्रश्न विचारा मन की बातच्या याआधीच्या एपिसोडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकता दिवस स्पेशलच्या तीन स्पर्धांच्या विजेत्यांची घोषणा करताना अनेक विषयांवर संवाद साधला होता. प्लास्टिक पिशव्या हटवण्याच्या आणि पश्चिम बंगालच्या बांसबेरियात त्रिवेणी कुंभ महोत्सवासह अनेक विषयांवर चर्चा केली होती. मन की बातचा १०० वा एपिसोड ३० एप्रिलला पूर्ण होईल. भारतात होत असलेल्या बदलांवर या कार्यक्रमाचे परिणाम यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी ऑल इंडिया रेडिओने १५ मार्चपासून शंभराव्या एपिसोडआधी एक मोहिम सुरू केली आहे.मनकी बातच्या एपिसोडमध्ये पंतप्रधान मोदींनी हायलाइट केलेल्या १०० विषयांना पुढे आणले जाईल. मन की बातच्या प्रत्येक एपिसोडशी संबंधीत मोदींच्या साउंड्स बाइट सर्व बुलेटिन आणि आकाशवाणी नेटवर्कच्या कार्यक्रमात प्रसारित केल्या जातील. ‘भाजपचा बिल्ला छातीला लावा’, राहुल गांधींकडून पत्रकाराचा अपमान   विजयादशमीच्या मुहूर्तावर ३ ऑक्टोबर २०१४  रोजी या कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. याआधीचा एपिसोड २६ फेब्रुवारी रोजी प्रसारित करण्यात आला होता. मन की बात हा कार्यक्रम दर महिन्याच्या रविवारी ऑल इंडिया रेडिओवरून प्रसारीत होणारा कार्यक्रम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या