JOIN US
मराठी बातम्या / देश / 50 वर्षांपूर्वी यासाठी घर सोडलं नव्हतं की...; PM मोदींनी सांगितली 'मन की बात'

50 वर्षांपूर्वी यासाठी घर सोडलं नव्हतं की...; PM मोदींनी सांगितली 'मन की बात'

पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री ते पंतप्रधान झाल्यानंतर दिल्लीत गेल्यावर झालेला एक बदलही सांगितला. त्यावर मात करण्यासाठी मन की बातमधून मार्ग मिळाल्याचं ते म्हणाले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली, 30 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात चा 100वा भाग आज प्रसारित झाला. देवरुपी जनतेच्या चरणांवरचा प्रसाद म्हणजे मन की बात असल्याचं मोदींनी म्हटलं. मन की बात हा माझ्यासाठी आध्यात्मिक प्रवास असल्याचंही मोदींनी सांगितलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री ते पंतप्रधान असा प्रवास करताना झालेला एक बदलही सांगितला. त्यावर मात करण्यासाठी मन की बातमधून मार्ग मिळाल्याचं ते म्हणाले. पन्नास वर्षांपूर्वी मी माझं घर यासाठी सोडलं नव्हतं की एक दिवस आपल्याच देशातील लोकांशी संपर्क करणं कठीण जाईल. माझे देशवासिय हे माझ्यासाठी सर्वकाही आहेत. मी त्यांच्यापासून दूर नाही राहू शकत. मन की बातने मला यातून मार्ग दिला. सामान्य माणसाशी जोडण्याचा मार्ग दाखवला. अमित शहांनी मुंबईत ऐकला ‘मन की बात’चा 100वा एपिसोड, मुख्यमंत्री शिंदेही उपस्थित   मी २०१४ ला दिल्लीला आलो. त्याआधी गुजरातमध्ये मुख्यमंत्री होतो तेव्हा लोकांशी बोलणं व्हायचं, भेटणं व्हायचं. दिल्लीत आल्यानंतर मला दिसलं की इथलं आय़ुष्य खूपच वेगळं आहे. कामाची पद्धत वेगळी आहे. जबाबदाऱ्या वेगळ्या आहेत. स्थिती , परिस्थितीचं बंधन आहे. सुरक्षेचे प्रोटोकॉल आहेत. वेळेचीही मर्यादा असते.

दिल्लीला आल्यानंतर सुरुवातीच्या दिवसात मला थोडं वेगळं वाटत होतं. खूप रिकामं रिकामं वाटायचं. पन्नास वर्षांपूर्वी म घर लोकांपासून दूर व्हायला नव्हतं सोडलं. देशवासियच माझे सर्वस्व आहेत. मी त्यांच्यापासून दूर नाही राहू शकत. मन की बातमुळे मला पुन्हा त्या लोकांशी संपर्क साधता आला. पदभार, प्रोटोकॉल व्यवस्थेपर्यंतच मर्यादित राहिला असं मोदींनी म्हटलं. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारण प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात करतात. विजयादशमीच्या मुहूर्तावर 3 ऑक्टोबर 2014 रोजी या कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. याआधीचा एपिसोड 26 फेब्रुवारी रोजी प्रसारित करण्यात आला होता. मन की बात हा कार्यक्रम दर महिन्याच्या रविवारी ऑल इंडिया रेडिओवरून प्रसारीत होणारा कार्यक्रम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधतात. ज्याचं प्रसारण डीडी नेटवर्कवरही केलं जातं. फक्त 30 मिनिटांचा हा कार्यक्रम. आज 30 एप्रिल रोजी याचे 100 एपिसोड पूर्ण होणार आहे. त्याआधी पीएम मोदींच्या या मन की बातचा देशावर नक्की काय परिणाम झाला, याचा रिपोर्ट सादर करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या