JOIN US
मराठी बातम्या / देश / Mann Ki Baat देशाचा आवाज बनलीय, PM मोदींनी साधला संवाद

Mann Ki Baat देशाचा आवाज बनलीय, PM मोदींनी साधला संवाद

mann ki baat 100th episode today updates : ५० वर्षांपूर्वी घर यासाठी नव्हतं सोडलं की आपल्याच लोकांशी संपर्क कमी होईल. मन की बातने मला सामान्य माणसाशी जोडण्याचा मार्ग दिला. पदभार, प्रोटोकॉल व्यवस्थेपर्यंतच मर्यादित राहिला असं मोदींनी म्हटलं.

जाहिरात

मन की बात

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली, 30 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा 100 वा एपिसोड आज झाला. भारतातच नव्हे तर परदेशातही अनेक ठिकाणी याचे प्रसारण करण्यात आलं. देशभरात बूथ पातळीवर एपिसोडचे लाइव्ह ब्रॉड कास्ट करण्यासाठी चार लाख सेंटर्स भाजपने तयार केली आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १०० ठिकाणी लोक एकत्र येऊन हा कार्यक्रम ऐकत होते. मन की बात देशाचा आवाज बनला आहे. लोक जशी देवाची पूजा करायला जातात आणि प्रसाद घेऊन येतात.  मन की बात माझ्या मनाचा आध्यात्मिक प्रवास बनलीय असे मोदी या एपिसोडमध्ये म्हणाले. मला या कार्यक्रमाने तुमच्यापासून दूर होऊ दिलं नाही. मी जेव्हा गुजरातचा मुख्यमंत्री होतो तेव्हा लोकांशी बोलणं, भेटणं व्हायचं. पण पंतप्रधान झाल्यानंतर इथलं आयुष्य वेगळं आणि काम वेगळं, जबाबदारी, अनेक प्रोटोकॉल, वेळेची मर्यादा आहेत. सुरुवातीला रिकामं वाटायचं. ५० वर्षांपूर्वी घर यासाठी नव्हतं सोडलं की आपल्याच लोकांशी संपर्क कमी होईल. मन की बातने मला सामान्य माणसाशी जोडण्याचा मार्ग दिला. पदभार, प्रोटोकॉल व्यवस्थेपर्यंतच मर्यादित राहिला असं मोदींनी म्हटलं. PM मोदींच्या ‘मन की बात’चे शतक! शंभराव्या एपिसोडचं UN मुख्यालयात थेट प्रसारण   मन की बातमध्ये याआधी ज्या लोकांचा उल्लेख केला ते असे हिरो आहेत ज्यांनी या कार्यक्रमाला जीवंत बनवलंय. आज आपण शंभराव्या एपिसोडचा टप्पा गाठला. या निमित्ताने पुन्हा एकदा या सर्व हिरोंशी बोलून त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे. आज आपण अशाच काही सहकाऱ्यांशी बोलणार असल्याचं मोदींनी सांगितलं. मला हे सांगताना समाधान वाटतंय की मन की बात मध्ये आपण देशातील नारी शक्तीच्या शेकडो प्रेरणादायी गोष्टींचा उल्लेख केला. अनेक मोहिमांमध्ये आपल्या नारी शक्तीने नेतृत्व केलं आणि मन की बात हा त्यांच्या प्रयत्नांसाठी व्यासपीठ बनलं असंही मोदी म्हणाले. मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आमदार पराग अळवणी आणि खासदार पूनम महाजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित आहेत. भाजपच्या सहकारी पक्षांनीही हा कार्यक्रम ऐकण्याचं आवाहन नागरिकांना केलंय. महिन्याच्या अखेरच्या रविवारी या कार्यक्रमाचे प्रसारण केले जाते. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात करतात. विजयादशमीच्या मुहूर्तावर 3 ऑक्टोबर 2014 रोजी या कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. याआधीचा एपिसोड २६ फेब्रुवारी रोजी प्रसारित करण्यात आला होता. मन की बात हा कार्यक्रम दर महिन्याच्या रविवारी ऑल इंडिया रेडिओवरून प्रसारीत होणारा कार्यक्रम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधतात. ज्याचं प्रसारण डीडी नेटवर्कवरही केलं जातं. फक्त 30 मिनिटांचा हा कार्यक्रम. आज 30 एप्रिल रोजी याचे 100 एपिसोड पूर्ण होणार आहे. त्याआधी पीएम मोदींच्या या मन की बातचा देशावर नक्की काय परिणाम झाला, याचा रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. 15 मार्चपासून विशेष मोहिम भारतात होत असलेल्या बदलांवर या कार्यक्रमाचे परिणाम यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी ऑल इंडिया रेडिओने १५ मार्चपासून शंभराव्या एपिसोडआधी एक मोहिम सुरू केली आहे.मन की बातच्या एपिसोडमध्ये पंतप्रधान मोदींनी हायलाइट केलेल्या १०० विषयांना पुढे आणले जाईल. मन की बातच्या प्रत्येक एपिसोडशी संबंधीत मोदींच्या साउंड्स बाइट सर्व बुलेटिन आणि आकाशवाणी नेटवर्कच्या कार्यक्रमात प्रसारित केल्या गेल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या