नवी दिल्ली, 23 जून : जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. कोरोनावर सर्वच देश लस शोधत आहे. अशात पतंजलीने (patanjali) कोरोनावर आयुर्वेदिक औषध शोधून काढले आहे. बाबा रामदेव यांनी कोरोनिल (Coronil) औषधाची घोषणा केली आहे. यामध्ये सात दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण बरा होईल, असा दावा बाबा रामदेव यांनी केला आहे. या औषधाचं क्लिनिकल ट्रायल घेण्यात आलं. त्यावेळी 69 टक्के कोरोना रुग्ण 3 दिवसांमध्ये बरे झाले तर 100 टक्के कोरोना रुग्ण सात दिवसांमध्ये बरे झालेत, असं रामदेव बाबा यांनी सांगितलं. बालकृष्ण यांनी दिलेल्या माहितीनुसैर, म्हणण्यानुसार, ‘दिव्य कोरोनिल टॅब्लेट’ मध्ये अश्वगंधा, गिलोय, अणू तेल, श्वासारी रस आणि तुळसी यांसारख्या औषधी वनस्पतींचा समावेश आहे. दरम्यान पतंजलीने कोरोनाव्हायरसविरोधातील हे औषध लाँच करताच सोशल मीडियावर मिम्स व्हायरल झालेत. सर्वात आधी म्हणजे बाबा रामदेव आणि पतंजलीची प्रतिक्रिया नेमकी कशी असेल?
कोरोनावरील औषध आणि लस शोधत असलेले इतर शास्त्रज्ञ बाबा रामदेव यांना काय बोलतील?
कोरोनाविरोधी औषधाच्या आशेवर असलेल्या नागरिकांची प्रतिक्रिया कशी असेल?
पतंजलीच्या रिसर्च सेंटरकडून 280 रुग्णांवर प्रयोग करण्यात आला होता. यात सात दिवसांमध्ये 100 टक्के रुग्ण हे बरे झाले होते. कोरोनिल औषधाचा रिझल्ट हा शंभर टक्के आहे. हे वाचा - एकेकाळी कर्ज घेऊन उभी केली होती रामदेवांनी पतंजली; आता मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा संपूर्ण नियमांचे पालन करून हे औषध तयार करण्यात आले आहे, अशी माहिती रामदेव बाबांनी दिली. कोरोनिल औषध हे सकाळी आणि संध्याकाळी एकदा घ्यावे लागणार आहे. या औषधामध्ये असलेला अश्वगंधा या व्हायरसच्या रिसेप्टर बाइंडिंग डोमेनला शरीरातील अँजिओटेन्सिन कनव्हर्टिंग एंजाइमला शरीरात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करते, असंही रामदेव यांनी सांगितलं. संपादन - प्रिया लाड