Home /News /national /

एकेकाळी कर्ज घेऊन उभी केली होती रामदेवांनी पतंजली; आता मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा

एकेकाळी कर्ज घेऊन उभी केली होती रामदेवांनी पतंजली; आता मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा

6 वर्षात कंपनीच्या व्यवसायात 2231 टक्के वाढ झाली आहे. कंपनीची एकूण उलाढाल आता 453 कोटी रुपयांवरून वाढून 10561 कोटी झाली आहे.

    नवी दिल्ली, 23 जून :  योगगुरू बाबा रामदेव सध्या बऱ्याच मोठ्या आजारांसाठी औषधं शोधत आहेत. या मालिकेत बाबा रामदेव यांच्या पतंजलीने आज कोरोनाव्हायरसला रोखणारं आयुर्वेदिक औषध  कोरोनिल लॉन्च केलं आहे. यापूर्वी ग्लेनमार्क फार्मा आणि सिप्ला यांनी भारतात कोविड - 19 च्या उपचारासाठी तयार केलेलं औषध लॉन्च केलं होतं. पतंजलीचा हा दावा किती प्रभावी ठरेल आणि इतर कंपन्यांना हा किती स्पर्धा देईल हे आता पाहावे लागेल. रामदेव यांच्या ट्रॅक रेकॉर्डनुसार त्यांच्यामध्ये दिग्गजांची स्पर्धा करण्याची क्षमता आहे. बाबा रामदेव यांच्या योगशिक्षकापासून कार्यकर्ते आणि एफएमसीजी व्यवसाय या यशस्वी प्रवासाबद्दल- एकेकाळी 13 हजार रुपयांमध्ये सुरू केली होती कंपनी हिंदी मॅगझिन आउटलुकमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार 1995 मध्ये पतंजली कंपनी म्हणून नोंदणीकृत झाली. बाबा रामदेव आणि त्यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण यांनी पतंजलीची नोंदणी अवघ्या 13 हजार रुपयांत केली होती. त्यावेळी या दोघांकडे फक्त 3500 रुपये होते. नोंदणी फीदेखील मित्रांकडून कर्ज घेऊन भरली होती. हे वाचा-VIDEO : मुसळधार पावसात नदीत अडकले 4 लहानगे; 5 तास सुरू होतं रेस्क्यू ऑपरेशन कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार 2011-12 या आर्थिक वर्षात कंपनीचे उत्पन्न 453 कोटी रुपये होते आणि नफा 56 कोटी होता. 2012-13 या आर्थिक वर्षात कंपनीचे उत्पन्न 849 कोटी रुपये झाले आणि नफा 91 कोटींवर गेला. जर आपण टक्केवारीचा दृष्टीकोन पाहिला तर 6 वर्षात कंपनीच्या व्यवसायात 2231 टक्के वाढ झाली आहे. कंपनीची एकूण उलाढाल आता 453 कोटी रुपयांवरून वाढून 10561 कोटी झाली आहे..
    First published:

    Tags: Patanjali ayurveda, Ramdev baba

    पुढील बातम्या