मुंबई, 26 एप्रिल : कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यादरम्यान अनेक जण विविध ठिकाणी आपल्या घरापासून लांब अडकून पडले आहेत. यातही अनेकजण असे आहेत जे आपल्या घरी पोहोचण्यासाठी काहीही करू शकतात. अशातच उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीची कहाणी समोर आली आहे. ज्या व्यक्तीने मुंबईहून आपल्या घरी अलाहाबादला पोहोचण्यासाठी लाख रुपये खर्च केले. न्यूज एजेंसी पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार अलाहाबादमध्ये राहणारे प्रेम मुर्ती पांडे मुंबई विमानतळावर काम करतात. ते मुंबईतील अंधेरी पूर्वेकडील आझादनगरमध्ये राहतात. त्यांनी सांगितले की, मुंबईत खूप गर्दी असते त्यामुळे येथे कोरोनाव्हायरस फैलाव होण्याची भीती आहे. पहिल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये मी मुंबईत होतो. मात्र लॉकडाऊन पुन्हा वाढविल्यानंतर मी अपेक्षा सोडून दिल्या. तेव्हाच माझ्या डोक्यात कल्पना आली. भाजीच्या ट्रकमध्ये घरी जाणे शक्यत असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यानंतर मी 3 लाख रुपये खर्च करुन घरी पोहोचलो.’ यापुढे प्रेम म्हणाले, सर्वात आधी मी 10 हजार रुपयांत 1300 किलो कलिंगड विकत घेतले आणि ते मिनी ट्रकवर लोड केले. त्या नंतर मी पिपंलागावमध्ये 40 किमी पायी काद्यांच्या बाजारातून भाव माहिती करुन घेतले आणि 2.32 लाख रुपयांत 25,520 किलो (9.10 रु प्रति किलो) चांगल्या दर्ज्याचे कांदे खरेदी केले. इतकच नाही तर एक छोटा ट्रक 77,500 रुपये भाड्याने घेतला. जेव्हा प्रेम मुंबईहून यूपीला पोहोचले तेव्हा त्यांनी ट्रक थेट आपल्या गावाजवळ मुंडेरा मंडईकडे नेला. जिथे त्यांनी कांदे आणि फळे विकण्याचा प्रयत्न केला. पण तेथील लोकांनी रोख पैसे देण्यास नकार दिला. अशा परिस्थितीत पांडे ट्रकसह आपल्या गावी पोहोचले आणि सर्व सामान घरातच उतरवले. पुढे ते म्हणतात की लॉकडाऊनमुळे कांद्याचे दर अजूनही कमी आहेत. परंतु लॉकडाऊन संपल्यानंतर या कांद्याची किंमत मिळेल अशी त्यांना आशा आहे. तसेच त्यांनी गावात पोहोचताच धुमनगंज पोलीस ठाणे गाठले आणि त्यांना सर्व हकीकत सांगितली. तसेच, पोलिसांची त्यांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना क्वारंटाइनमध्ये राहण्यास सांगितले आहे. संबंधित - 3 मे रोजी लॉकडाऊन संपणार त्यानंतर काय? उद्धव ठाकरेंच्या संवादातील ठळक मुद्दे