नवी दिल्ली, 5 जुलै : कोणत्याही ट्रेनमध्ये काही आकस्मिक कारणांसाठी गाडी थांबवायची असेल तर एक इमर्जन्सी चेन असते. पण ही चेन जर विनाकारण खेचली तर तो गुन्हा ठरतो.नवी दिल्लीहून भोपाळला जाणाऱ्या शताब्दी एक्सप्रेसमध्येही असाच प्रकार घडला. मनीष अरोरा नावाच्या एका व्यक्तीने अशीच ट्रेनची चेन खेचली. कारण काय तर त्याच्या आईचा नाश्ता वेळेत पूर्ण होणार नाही, असं त्याला वाटलं! दिल्लीहून भोपाळला जाणाऱ्या ट्रेनमध्ये मथुरा जंक्शन आलं तेव्हा मनीषने ही ट्रेन खेचली. याबदद्ल त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आणि त्याला अटकही करण्यात आली. अटकेनंतर त्याला जामिनावर सोडण्यात आलं. राजीव गांधी हत्या प्रकरणातल्या या आरोपीला ‘पॅरोल’ मंजूर रेल्वेच्या नियमांनुसार कलम 141 अंतर्गत अशा प्रकारची कारवाई करण्यात येते. मनीष अरोरा ट्रेनमधल्या सी - 8 कोचमधून प्रवास करत होते. त्यांना मथुरेला उतरायचं होतं. त्यांना दिल्लीमध्ये ब्रेकफास्ट देण्यात आला. हा ब्रेकफास्ट मथुरेला उतरेपर्यंत संपणार नाही, असं त्यांना वाटलं. त्यांनी ट्रेनची चेन खेचली आणि त्यामुळे ट्रेन बराच वेळ थांबवावी लागली. यामुळे मनीष यांच्या आईचा ब्रेकफास्ट पूर्ण झाला असेल पण त्याची मोठी किंमत मनीष यांना मोजावी लागली. मनीषला आता रेल्वे मॅजिस्ट्रेटसमोर हजर होऊन दंड भरावा लागणार आहे. कोणत्याही नियमांचं भान न ठेवता बेजबाबदारपणे ट्रेनचा प्रवास केला तर तो महागात पडू शकतो हेच या घटनेवरून दिसून आलं. तसंच अगदी खरोखरच महत्त्वाचं कारण असल्याशिवाय ट्रेनची चेन खेचू नये हाही धडा मिळाला. ================================================================================================= 100 खोल्या असलेलं 20 कोटींचं हॉटेल भुईसपाट, पाहा VIDEO