ज्योती मौर्या
पीयूष शर्मा, प्रतिनिधी मुरादाबाद, 6 जुलै : सध्या सोशल मीडियावर एका महिलेची खूप जास्त चर्चा होत आहे. एसडीएम ज्योती मौर्य यांनी आपल्या पतीला सोडल्यामुळे त्या सोशल मीडियावर खूप ट्रोल होत आहेत. ज्योती मौर्या आणि त्यांच्या पतीबद्दल लोक वेगवेगळ्या प्रकारे कमेंट करून चर्चा करत आहेत. यासोबतच ज्योती मौर्या यांनी यूपीच्या मुरादाबादमध्ये शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात तक्रार देण्यात आली आहे. तसेच त्यांनी आपल्या पतीला शिवीगाळ केली. यासोबतच जातीवाचक शब्दही वापरले, असा आरोप करण्यात आला आहे. अपशब्द बोलल्याप्रकरणी एका समाजाच्या लोकांनी एसडीएम ज्योती मौर्य यांच्याविरोधात मुरादाबादमधील मुंधापांडे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एसडीएम ज्योती मौर्य यांनी त्यांच्या पतीसोबत जो विश्वासघात केला, त्याच्या बातम्या समोर आल्यानंतर ज्योती मौर्या यांना ट्रोल केले जात आहे.
नवीन व्हिडिओ व्हायरल - दरम्यान, आणखी एक व्हिडिओ आता सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये लोक दावा करत आहेत की त्यातील महिला अधिकारी ज्योती मौर्य आहे. व्हिडिओमध्ये महिला काही जातीवाचक शब्द वापरताना दिसत आहे. या व्हिडिओच्या आधारे एका विशिष्ट समाजाच्या लोकांनी ज्योती मौर्य यांच्यावर कारवाई करण्याची तक्रार केली आहे. मात्र, न्यूज 18 या व्हिडिओची पुष्टी करत नाही. यासोबतच हा व्हिडीओ पाहून संतप्त झालेल्या एका संघटनेच्या लोकांनी मुंढापांडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तसेच त्यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती कायद्यान्वये कारवाई करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी पोलीस आता काय कारवाई करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.