JOIN US
मराठी बातम्या / देश / कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या संशयातून लष्करी अधिकारी रुग्णालयात

कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या संशयातून लष्करी अधिकारी रुग्णालयात

हा अधिकारी इराणला काही कार्यालयीन कामासाठी गेला होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिनांक 3 मार्च, प्रतिनिधी : इराणहून परतलेल्या भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याच्या संशयावरून मध्यप्रदेशातल्या महू इथे स्वतंत्र वॉर्ड तयार करुन त्यामध्ये ठेवण्यात आलं आहे. हा अधिकारी इराणला काही कार्यालयीन कामासाठी गेला होता. इराणहून भारतामध्ये परत आल्यावर विमानतळावर तपासणी झाली. पण त्यावेळी काही संशयास्पद सापडलं नाही. पण काही दिवसातच हा अधिकारी मध्ये प्रदेशातल्या महू इथे पोहोचल्यावर त्याला काही त्रास होऊ लागला. यामुळे तपासणी केल्यावर तातडीने या अधिकाऱ्याला महू इथल्याच लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यासाठी एक स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला असून अन्य कोणीही त्यांच्याशी संपर्क ठेवणार नाही याची काळजी घेतली जात आहे.

संबंधित बातम्या

भारतातील नवी दिल्ली, तेलंगाणा आणि राजस्थानमध्ये सोमवारी कोरोनाव्हायरसचे एकूण 3 रुग्ण सापडले. जयपूरमध्ये इटलीतील पर्यटकाच्या रक्ताच्या नमुन्याचा मंगळवारी पुण्याहून आलेला रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यानंतर आता त्याच्या पत्नीचा एसएमएस रुग्णालयातील रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तिच्या रक्ताचे नमुने पुन्हा तपासणीसाठी पुण्यात पाठवण्यात आलेत. कोरोनाव्हायरग्रस्त इटालियन नागरिकांना रुग्णालयात आइसोलेशन वार्डमध्ये (Isolation ward) ठेण्यात आलं आहे. संबंधित -  ‘कोरोना’शी लढ्याचं ‘केरळ मॉडेल’, भारतातील पहिले 3 रुग्ण असे झाले व्हायरसमुक्त रुग्णालयापासून 3 किलोमीटरचा परिसर संसर्गाचा धोका असलेला परिसर (containment zone) म्हणून घोषित करण्यात आला. आरोग्य अधिकारी या परिसरातील घरोघरी जाऊन आरोग्याची तपासणी करणार आहेत. दिल्लीतील इटालियन नागरिकांना ITBP कॅम्पमध्ये पाठवलं उत्तर प्रदेशच्या आग्र्यात कोरोना व्हायरसचे 6 संशयित रुग्ण आहेत, तर दिल्लीतील एका हॉटेलमध्ये 24 संशयित रुग्ण आढळून आलेत. यामध्ये 21 इटालियन नागरिक आणि 3 भारतीयांचा समावेश आहे. त्यांच्यामध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसताच त्यांना तात्काळ भारत-तिबेट सीमा पोलीसच्या (ITBP) कॅम्पमध्ये पाठवण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या