JOIN US
मराठी बातम्या / देश / Viral Video : OMG! पावसाच्या पाण्यात वाहून गेली भलीमोठी स्कॉर्पियो कार, पाहा VIDEO

Viral Video : OMG! पावसाच्या पाण्यात वाहून गेली भलीमोठी स्कॉर्पियो कार, पाहा VIDEO

Viral Video : स्थानिक लोकांनी ही कार काढण्याचा प्रयत्न केला. अगदी स्थानिक लोकांनी ट्रॅक्टरची मदतही घेतली मात्र सगळे प्रयत्न अपयशी ठरले.

जाहिरात

कार गेली वाहून

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हिमाचल प्रदेश : देशभरात मान्सून दाखल झाला आहे. मात्र काही ठिकाणी पावसाचा जोर जास्तच आहे. नुकताच नागालँडमध्ये कारवर दरड कोसळून गाड्यांचं नुकसान झाल्याची घटना ताजी असताना आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ काळजाचा ठोका चुकवणारा आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचं थैमान सुरू आहे. पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं असून ग्रामस्थही घरात अडकून पडले आहेत. एवढंच नाही तर काही गावांचा संपर्क तुटला आहे. ठिकठिकाणी दरड कोसळत आहेत. यातच आता हिमाचल प्रदेशमधील एक व्हिडीओ समोर आला आहे.

संबंधित बातम्या

ह्या व्हिडीओमध्ये चक्क स्कॉर्पियो कार पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचं दिसत आहे. पुराच्या पाण्याचा वेग खूप जास्त होता. यामध्ये ही कार अडकली. स्थानिक लोकांनी ही कार काढण्याचा प्रयत्न केला. अगदी स्थानिक लोकांनी ट्रॅक्टरची मदतही घेतली मात्र सगळे प्रयत्न अपयशी ठरले. ओ दीदी नव्हे…ओ काकू… चार रस्त्यावर काकूंनी अशी पळवली गाडी की थेट गाठलं रुग्णालय व्हिडीओमध्ये पाहू शकता की, आधी कार मालक गाडीच्या बोनेटवर उभा आहे आणि पुढच्या भागावर गाडी लावून गाडी थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये त्याला यश आलं नाही. यानंतर स्थानिक लोकांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने दोरी बांधून कार बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र हा प्रयत्न फसला आहे.

भरधाव स्कॉर्पिओ कार पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेली. मात्र, गाडीत कोणीही नव्हतं त्यामुळे मोठी जीवितहानी टळली, मात्र या घटनेमुळे परिसरात काहीसं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या