प्रयागराज, 1 एप्रिल : कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने देशभरात लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आलं आहे. यादरम्यान मंगळवारी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील काटजू रोड येथील शेख अब्दुल्ल मशिदीतील 37 लोकांपैकी 7 जण इंडोनेशियातून आले आहेत. पोलीस अधीक्षक बृजेश कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले की शेख अब्दुल्ला मशिदमध्ये हे लोक 22 मार्चपासून थांबले असून यापैकी 9 जण दिल्लीतील निजामुद्दीन मरकज तब्लिगी जमातमध्ये सहभागी झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. संबंधित - चर्चमधल्या कार्यक्रमाने फुटला कोरोनाचा टाईम बॉम्ब? ‘या’ देशात 3500 जणांचा मृत्यू त्यांनी सांगितले की, तब्लिगी जमातीतील सहभागी लोक ट्रेनने 22 मार्च रोजी प्रयागराजला आले आणि या मशिदीत राहिले. मशिदीच्या प्रबंधकांनी पोलीस आणि प्रशासनाला याबाबत माहिती दिली आहे. यासाठी मशिदीचे प्रबंधक वसीम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी सांगितल्यानुसार मंगळवारी सायंकाळी उशिरा जिल्हाधिकारी भानुचंद गोस्वारी, एसएसपी सत्यार्थ आदी डॉक्टरांच्या टीमसह शेख अब्दुला मशिदीत पोहोचले, जेथे हे 37 जण राहत होते. यांमध्ये केरळ आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी एका व्यक्तीचा सहभाग आहे. पोलिसांनी दक्षता म्हणून अन्य धार्मिक स्थळ, धर्मशाळा आणि हॉटेलांचा शोध सुरू केला आहे. देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत हा आकडा 1600 पार गेला आहे. काल दिल्लीतील प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यांमधील नागरिकांना क्वारंटाइन करण्यास सांगण्यात आले आहे. दिल्लीच्या कार्यक्रमात सहभागी असलेले व त्यांच्या संपर्कात असलेल्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. अशांनी स्वत:हून पुढे यावं असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. कोरोना बळावू नये यासाठी हे आवश्यक आहे. संबंधित - Coronavirus update - भारतात 24 तासांत 240 रुग्ण, मृतांचाही आकडा वाढला