JOIN US
मराठी बातम्या / देश / Modi सरकारकडून शेतकऱ्यांना नव्या वर्षाची खास भेट, 'या' तारखेला खात्यात जमा होणार पैसे

Modi सरकारकडून शेतकऱ्यांना नव्या वर्षाची खास भेट, 'या' तारखेला खात्यात जमा होणार पैसे

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नव्या वर्षात केंद्र सरकारकडून खास भेट

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 31 डिसेंबर: केंद्र सरकारकडून नव्या वर्षात शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 2 जानेवारी 2020ला कर्नाटकातील तुमकूर इथे पंतप्रधान किसान योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी सहा कोटी शेतकऱ्यांमध्ये 12,000 कोटींची रक्कम खात्यात जमा करणार आहेत. डिसेंबर महिन्यातील 2000 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप आला नसल्यानं नव्या वर्षात उरलेल्या रकमेसह खात्यात पैसे जमा करणार असल्याची माहिती मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्यासोबत संलग्न आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा करण्यात येणार असल्यानं त्याचा फायदा साडेसहा कोटी शेतकऱ्यांना होणार आहे. हेही वाचा- Digital Paymentची सुविधा नसलेल्या उद्योजकांना दरदिवशी होणार 5 हजारांचा दंड सरकारकडून 1 ते 29 डिसेंबर आधारकार्ड बँक खात्यासोबत जोडण्याची मुदत देण्यात आली होती. 29 डिसेंबरपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 9.2 कोटी शेतकऱ्यांची माहिती सरकारपर्यंत पोहोचू शकली आहे. 2 जानेवारीला केंद्र सरकारकडून साडेसहा कोटी शेतकऱ्यांमध्ये एकूण 12 हजार कोटी रुपयांचं वाटप केलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.पश्चिम बंगालमधील 70 लाख शेतकऱ्यांना या योजनेची मदत होणार आहे. उत्तर प्रदेशातील सर्वाधिक 2 कोटी शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्यात सरकारला यश आलेले आहे. केंद्र सरकारने या योजनेसाठी 75 हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती. यातील 45 हजार कोटींचे वाटप करण्यात आले असून, आता जानेवारीत 12 हजार कोटींचे वाटप करण्यात येईल. अंतरिम अर्थसंकल्पात डायरेक्ट-बेनेफिट ट्रांसफर स्कीम जाहीर करण्यात आली. या योजनेत तीन हप्त्यात 2 हजार दशलक्ष लघु व सीमांत शेतकर्‍यांना (ज्यांची 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. 2,000-2,000 वर्षाकाठी 6,000 रुपयांची रक्कम देण्याची योजना होती. मात्र, यंदा दुसर्‍या टर्मसाठी सत्तेत आल्यानंतर सरकारने त्यातील प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेचा लाभ देण्याचे ठरवलं आहे. हेही वाचा- 5 G स्पेक्ट्रम : मोदी सरकार सगळ्या कंपन्यांना देणार ट्रायलची संधी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या