JOIN US
मराठी बातम्या / देश / जगातील Covid – 19 च्या युद्धात नरेंद्र मोदींची आघाडी, लोकप्रिय नेत्याच्या यादीतही टॉपवर

जगातील Covid – 19 च्या युद्धात नरेंद्र मोदींची आघाडी, लोकप्रिय नेत्याच्या यादीतही टॉपवर

एकीकडे मोदींची लोकप्रियता वाढत असतान ट्रम्प यांची रेटिंग मात्र घटली आहे

जाहिरात

Kalaburagi: Prime Minister Narendra Modi addresses during a rally, in Kalaburagi, Wednesday, March 6, 2019. (PTI Photo)(PTI3_6_2019_000089B)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली/ वॉशिंग्टन, 22 एप्रिल : कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) महासंकटात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जगातील सर्व बड्या नेत्यांना मागे सोडले आहे आणि ते आघाडीवर पोहोचले आहेत. आताच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार पीएम मोदी यांची लोकप्रियता 68 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी लोकप्रियता 3 टक्क्यांनी घटली आहे. अमेरिकेच्या ग्लोबल डेटा इटेंलिजन्स कंपनी मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्सनुसार 14 एप्रिलपर्यंत मोदींची रेटिंग 68 टक्के झाल्याची सांगितले, जी गेल्या वर्षी 62 टक्के इतकी होती. म्हणून आघाडीवर आहेत मोदी पीएम मोदी यांच्या रेटिंगमधील सुधारणा ही कोरोना व्हायरसविरोधात त्यांनी केलेली तयारी आणि निर्णयामुळे असल्याचे सांगितले जाते. त्यांनी 25 मार्च रोजी देशात लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यानंतर 14 एप्रिलला लॉकडाऊनची मर्यादा वाढवून 3 मेपर्यंत करण्यात आली आहे. त्यांनी वैश्विक नेत्यांना या आजाराशी सामना करण्यासाठी एकजूट करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय सार्क देशांचा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठकी घेतल्या आणि जी 20 देशांची बैठक करण्यासाठी प्रयत्न केला. त्यामुळे मोदींची लोकप्रियता वाढत आहे. याशिवाय त्यांनी आवश्यक औषधांवर निर्बंध हटवून मदतीसाठी जगभरातील अनेक देशांना निर्यात केला, या कारणांमुळे मोदींच्या लोकप्रियतेच्या टक्क्यांमध्ये वाढ झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवभारत टाइम्सने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. ट्रम्प यांची रेटिंग घटली गैलपच्या पोलनुसार मार्च महिन्याच्या मध्यात अमेरिकेत लागू केलेल्या लॉकडाऊनदरम्यान ट्रम्प यांची लोकप्रियता 49 टक्के इतकी होती. त्यामध्ये घट होऊन ती 43 टक्क्यांवर आली आहे. अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 40000 जणांचा मृत्यू झाला आहे. लोकप्रिय नेत्यांच्या यादीच जपानचे पीएम शिंजो आबे सर्वात खाली असून मेक्सिकोचे राष्ट्रपती आंद्रे मॅन्यूअल लोपेज ओब्राडार दुसऱ्या क्रमांकावर आहे. संबंधित - कोरोनाशी लढणाऱ्या आशा वर्कर्संना धक्कादायक वागणूक, वाट्याला आल्या दगडफेक, शिव्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या