नागपूर, 22 एप्रिल : देशभरातील कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या 20000 च्या जवळ पोहोचली आहे. त्यात मृतांचा आकडा 600 हून अधिक आहे. राज्यातही हिच परिस्थिती आहे. कोरोनाबाधितांची (Covid -19) वाढती संख्या पाहता विविध भागांमध्ये रेड झोन तयार करुन त्यांचे सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून घरांमधील नेमकी स्थितीचा आढावा घेऊन अधिक कडक पावले उचलण्यासाठी मदत होत आहे. अशाच रेड झोनमध्ये (Red Zone) आशा वर्कर्स लोकांच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण घेत आहे. मात्र त्यांना धक्कादायक वागणूक दिल्याची बाब समोर आली आहे. नागपूरातील काही रेड झोनमध्ये आशा कार्यकर्त्यांना सर्वेक्षण करण्यासाठी पाठविले होते. याशिवाय कोरोनाबाबत जागरुकता निर्माण करण्याचे कामही त्यांना सोपविण्यात आले आहे. मात्र या कार्यकर्त्यांना वाईट वागणूक देण्यात येत आहे. याबाबत आशा कार्यकर्त्यांनी आपले अनुभव शेअर केले.
आम्ही जेव्हा या भागात सर्व्हे करायला जातो, तेव्हा लोक आम्हाला दगड फेकून मारतात. शिव्या देतात. तुम्ही येथे का आलात असा प्रश्न विचारतात. आम्ही तुमच्या चांगल्यासाठी येथे आल्याचे त्यांना सांगितले जाते. आम्हाला फक्त माहिती हवी असल्याचे नागरिकांना सांगत असल्याचे आशा कार्यकर्ता उषा ठाकूर यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून पोलीस, नर्सेस, डॉक्टर यांच्यावर हल्ला होत असल्याचे वृत्त समोर येत आहेत. कोरोना योद्धांवर हल्ले करणं योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. स्वत:ची पर्वा न करता देशसेवेसाठी झोकून देणाऱ्यांवर हल्ल्याच्या घटना समोर येत आहेत. संबंधित - ‘Corona ची लागण किंवा मृत्यूचं भय नाही पण…’, कोरोना योद्धांनी मांडली व्यथा संपादन, संकलन - मीनल गांगुर्डे