JOIN US
मराठी बातम्या / देश / नमो टीव्हीवर अखेर बंदी नाही पण आयोगाने लादले हे नियम

नमो टीव्हीवर अखेर बंदी नाही पण आयोगाने लादले हे नियम

निवडणूक आयोगाने नमो टीव्हीचं प्रसारण बंद न करता त्यावर काही बंधनं घातली आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 17 एप्रिल : निवडणूक आयोगाने नमो टीव्हीचं प्रसारण बंद न करता त्यावर काही बंधनं घातली आहेत. मतदानापूर्वी 48 तास आधी रेकॉर्डेड कार्यक्रम दाखवू नयेत. कुठल्याही कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण दाखवायला मात्र बंदी नाही. राज्यांच्या निवडणूक आयुक्तांनी नमो चॅनेलवर लक्ष ठेवावं, असंही आयोगानं म्हटलं आहे. काय आहे नमो टीव्ही? लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी नमो टीव्हीची सुरुवात झाली होती. नमो टीव्ही वर पंतप्रधान मोदींच्या सभा दाखवल्या जातात. त्याशिवाय भाजपचे आणखीही कार्यक्रम दाखवले जातात. नमो टीव्ही हे न्यूज चॅनल आहे, असं टाटा स्कायचं म्हणणं होतं. पण नंतर मात्र ही एक खास सेवा आहे, असं टाटा स्काय ने म्हटलं.

परवानगी नाही या चॅनलसाठी कोणताही परवाना घेतलेला नाही, असा विरोधकांचा आरोप होता. एखाद्या चॅनलवरून फक्त एकाच पक्षाच्या बातम्या दाखवू शकत नाही, असा आक्षेप घेत विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. याआधी, निवडणूक आयोगाने ‘पीएम नरेंद्र मोदी’ या मोदींच्या बायोपिकवरही काही कट सूचविले होते. पीएम नरेंद्र मोदी, NTR Laxmi आणि Udyama Simham या तीन बायोपिकवर बंदी घालण्यात आली आहे. हे सिनेमे निवडणूक काळात रिलीज करता येणार नाहीत, असा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे. आयोगाच्या या आदेशामुळे या तिन्ही सिनेमांच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

VIDEO जेव्हा 20 सिंहांचा कळप गावाच्या दिशेनं येतो…

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या