JOIN US
मराठी बातम्या / देश / मुस्लिमांनी ‘राम नाम’ जप करीत केला अंत्यसंस्कार, दु:खाच्या काळात नातेवाईकांनी फिरवली पाठ माणुसकी धावून आली

मुस्लिमांनी ‘राम नाम’ जप करीत केला अंत्यसंस्कार, दु:खाच्या काळात नातेवाईकांनी फिरवली पाठ माणुसकी धावून आली

हेच भारतीयांच खरं स्पिरीट आहे. हा व्हिडीओ पाहिला की कठीण समयी जात-धर्म विसरुन लोक एकमेकांच्या पाठिशी उभे राहतात हे दिसतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 29 मार्च : कोरोनाचा (Coronavirus) व्हायरचा विळखा संपूर्ण देशभरात पसरला आहे. कोरोनाचा (Covid - 19) प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग करण्यास सांगितले जात आहे. यादरम्यान नागरिकांना केवळ घरातच राहण्याचा सल्ला दिला जात आहे. या संकटात एका कुटुंबावर दुहेरी संकट आलं. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी भीतीने अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांनी पाठ फिरवली. मात्र अशा कठीण परिस्थितीत मुस्लीम बांधवांनी पुढे येत अंत्यसंस्कार केला. संबंधित -  उद्धव ठाकरेंचा शिलेदार! आईचा दशक्रिया विधी न करताच विकास खारगे मंत्रालयात हजर बुलंदशहर येथील रविशंकर यांचा मृत्यू झाला होता. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे नातेवाईकांनी त्यांच्या घरी येणं टाळलं. मात्र याचवेळी शेजारील मुस्लीम बांधव त्या कुटुंबाच्या मदतीसाठी धावले. व रविशंकर यांचे शव आपल्या पाठीवर घेऊन त्यांना स्मशानभूमीत घेऊन गेले. इतकचं नव्हे तर शव पाठीवर घेतल्यानंतर ते ‘राम नाम सत्य है’ म्हणत होते. काँग्रेस ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी याबाबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हेच भारताचं स्पिरीट आहे. हिच भारताची संकल्पना आहे, असं म्हणत त्यांनी देशाची एकता दाखवून दिली; अशी प्रतिक्रिया शशी थरुर यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

कठीण समयी जो मदतीसाठी धावून येतो तोच खरा मित्र असं म्हटलं जात. या उदाहरणावरुन हेच दिसून येत की आपण एकत्र आहोत. जेव्हा आपल्या देशावर संकट येतं तेव्हा आम्ही धर्म-जात विसरुन एकमेकांच्या मागे उभे राहतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या