JOIN US
मराठी बातम्या / देश / तीन तलाक-हलालाची भीती, तरुणीने बदलला धर्म, हिंदू तरुणाशी केले लग्न, म्हणाली, आता जीवाला धोका...

तीन तलाक-हलालाची भीती, तरुणीने बदलला धर्म, हिंदू तरुणाशी केले लग्न, म्हणाली, आता जीवाला धोका...

इस्लाम धर्म सोडून मी सनातन धर्म स्विकारला आहे आणि वीरेंद्र कश्यपसोबत माझे लग्न झाले आहे, असेही तिने सांगितले.

जाहिरात

फरहाना-वीरेंद्र

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रशांत कुमार, प्रतिनिधी बरेली, 27 जुलै : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या, तसेच बलात्काराच्याही घटना समोर येत आहेत. त्यातच आता एक घटना समोर आली आहे. एका तरुणीने मुस्लीम धर्म सोडून हिंदू धर्म स्विकारला आहे. फरहाना बी असे या तरुणीचे नाव असून तिने वीरेंद्र कश्यप नावाच्या एका तरुणासोबत हिंदू धर्माच्या परंपरेनुसार लग्न केले. ही घटना उत्तरप्रदेशच्या बरेलीच्या शेरगढ येथील आहे. ऋषि मुनि आश्रम पोहोचून दोघांनी आयुष्यभर सोबत राहण्याचा निर्णय घेतला. फरहाना-वीरेंद्र हे दोन्ही शेजारील गावाचे रहिवासी आहेत. नवविवाहित तरुणी फरहाना बी हिने सांगितले की, भगवान श्री कृष्णावर माझी सुरुवातीपासून श्रद्धा होती आणि मी माझ्या घरी लपून भगवान श्रीकृष्णाची पूजा करायची. त्यानंतर वीरेंद्र कश्यप नावाच्या एका तरुणाशी माझी मैत्री झाली. आम्ही दोन्ही राधा राणीच्या मंदिर फिरायला गेलो आणि तिथेच आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला.

तसेच इस्लाम धर्म सोडून मी सनातन धर्म स्विकारला आहे आणि वीरेंद्र कश्यपसोबत माझे लग्न झाले आहे, असेही तिने सांगितले. फरहाना ही पुढे म्हणाली की, आता मला तीन तलाक आणि हलाला याची भीती नाही. कारण आमच्या धर्मामध्ये तीन तलाकची पद्धत मोठी असते आणि नंतर मुलींना हलालाचा सामना करावा लागतो. दरम्यान, सध्या या नवविवाहित दाम्पत्याला आपल्या जीवाला धोका असल्याचे वाटत आहे. तरुणीचे नातेवाईक जीवे मारण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे या दाम्पत्याने बरेलीचे एसएसपी प्रभाकर चौधरी यांच्याकडे तक्रार केली आहे. यानंतर त्यांना सुरक्षा देण्याचे आदेश एसएसपी चौधरी यांनी दिले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या