लाच घेताना पकडताच गिळल्या नोटा, VIDEO VIRAL
भोपाळ, 25 जुलै : सरकारी कामासाठी नागरिकांकडून लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांना पकडण्यासाठी गेल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकासमोर एक धक्कादायक प्रकार घडला. मध्य प्रदेशातील कटनीमध्ये एका तलाठ्याला पोलिसांनी लाच घेताना पकडलं. तेव्हा कारवाईपासून वाचण्यासाठी लाचेची पूर्ण रक्कम चावून गिळली. या प्रकारानंतर क्लार्कला अटक करण्यात आली असून त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, कटनीच्या बिलहरीमध्ये तलाठी असलेल्या गजेंद्र सिंहने चंदन लोढीकडून जमीन मोजणी आणि अहवालाच्या बदल्यात लाचेची मागणी केली होती. त्यानंतर पीडित व्यक्तीने १० जुलै २०२३ रोजी याबाबतची तक्रार लोकायुक्त पोलीस अधीक्षकांकडे केली होती. ज्योतीला पतीने शिकवून बनवलं पोलीस, आता तिने धरला प्रियकराचा हात तक्रारीनंतर अधिकाऱ्यांनी तक्रारीची शहानिशा करताना सत्य समोर आलं. लाचेची रक्कम घेण्यासाठी गजेंद्र सिंहने चंदनला आपल्या कार्यालयात बोलावलं होतं. यावेळी लाच प्रतिबंधक विभागाची टीम पूर्ण नियोजन करून तिथे पोहोचली होती.
जबलपूर लोकायुक्तांच्या पथकाने गजेंद्र सिंहला रंगेहात पडकलं. त्याने जमीनीच्या मोजणीसाठी पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. त्याला लाचेची रक्कम म्हणून ५०० च्या ९ नोटा दिल्या होत्या. कारवाई करण्यास अधिकारी आल्याचे समजताच त्याने अधिकाऱ्यांसमोरच नोटा तोंडात घालून चावण्यास सुरुवात केली. अधिकाऱ्यांनी त्याच्या तोंडातून पैसे काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने अधिकाऱ्याचे बोट चावले. शेवटी त्याला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी गजेंद्रने गिळलेल्या नोटांचा लगदा काढला. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.