JOIN US
मराठी बातम्या / देश / भयंकर पाऊस, 4 दिवसांपासून अडकली 20 माकडे, याठिकाणी काय घडलं? पाहा, Video

भयंकर पाऊस, 4 दिवसांपासून अडकली 20 माकडे, याठिकाणी काय घडलं? पाहा, Video

माकडावंर याठिकाणी भयानक परिस्थिती ओढवली आहे.

जाहिरात

माकडे अडकली पाण्यात

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हिमांशु नारंग, प्रतिनिधी करनाल, 13 जुलै : सध्या भारतातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे अनेक गावांतील लोकांवर संकट कोसळले आहे. यातच हरयाणाच्या करनाल इथे हथिनीकुंड बैराज येथून पाणीही सोडण्यात आले आहे. त्यामुळे करनालच्य अनेक गावातील भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीचा फटका मुक्या प्राण्यांनाही बसला आहे. इंद्री हा परिसर यमुदा नदीच्या जवळ येतो. अशा परिस्थितीत गावात खूप पाणी घुसले आहे. बैराज येथूनही पाणी सोडण्यात आल्याने गावातील परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पूरसदृश्य या परिस्थिती ज्या लोकांना याचा फटका बसला आहे, त्यांना प्रशासन आणि गुरुद्वाराच्या माध्यमातून मदत केली जात आहे.

यादरम्यान, फोटो समोर आले आहेत. येथील पाण्याच्या प्रवाहात अनेक माकडे फसली आहे. पाण्याची खोली आणि वेग खूप जास्त असल्याने अनेक माकडांना झाडावर आश्रय घेतला आहे. चार दिवसांपासून ते काही न खाता आपल्या लहान पिल्लांसह तिथेच अडकून आहेत.

इंद्रीच्या नगली गावाजवळ काही झाडे आहेत, त्यांच्यावर ही माकडे बसली आहेत. याठिकाणी सगळीकडे पाणीच पाणी झाल्याने काही माकडे ही प्राण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहेत. या माकडांची संख्या 20 च्या जवळ आहे. कसाबसा आपला जीव वाचवत ही माकडे झाडावर अडकली आहेत. काही लोकांनी या माकडांना मदत करण्याचा प्रयत्न केला. ते केळी आणि हरबरे घेऊन आले. मात्र, पाणी जास्त असल्याने ते दुर्दैवाने या माकडापर्यंत हे पोहोचवू शकले नाही. माकडांना पुलापर्यंत येता येत नाहीए तसेच लोकांनाही त्यांना मदत करता येत नाहीए. अशा परिस्थितीत या माकडांचा जीव वाचावा म्हणून, प्रशासनाने बोटीच्या माध्यमातून माकडांना मदत करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या