JOIN US
मराठी बातम्या / देश / पाकिस्तानमध्ये बॉयब्रेंडला भेटायला गेली अंजू, अनेकदा बोलली खोटं, Visa अर्जातही लिहिलं की...

पाकिस्तानमध्ये बॉयब्रेंडला भेटायला गेली अंजू, अनेकदा बोलली खोटं, Visa अर्जातही लिहिलं की...

सीमा हैदर प्रकरण समोर आल्यानंतर भारतात एकच खळबळ उडाली होती. मात्र, आता अंजूचे प्रकरण समोर आले आहे.

जाहिरात

अंजू

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अलवर, 25 जुलै : सध्या देशात पाकिस्तानातून नेपाळमार्गे बेकायदेशीरपणे भारतात आलेल्या सीमा हैदरची बरीच चर्चा होत आहे. सीमा तिचा प्रियकर सचिन मीणा याला भेटण्यासाठी पाकिस्तानातून नोएडा येथे आली. मात्र, यानंतर आता आणखी एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. आता राजस्थानच्या अलवर येथील अंजू तिचा प्रियकर नसरुल्लाह याच्यासाठी चक्क राजस्थानच्या अलवर येथून थेट पाकिस्तानला चालली गेली. अंजू सध्या नसरुल्लाहसोबत पाकिस्तानच्या दीर बाला भागात आहे, असे सांगितले जात आहे. मात्र, अंजूने पतीला व्हिडिओ कॉल करून लवकरच मी परत येईन, असे सांगितले. तर इतकेच नव्हे तर तिने आपल्या मुलीलासुद्धा मी परत येईन असे प्रॉमिस केले. दरम्यान, या सर्व प्रकारानंतर आता अंजूचा पती अरविंद आपली पत्नी अंजूची परत येण्याची येण्याची वाट पाहत आहे. त्याने यासाठी सरकारकडे मदतीचे आवाहनही केले आहे. सीमा हैदर प्रकरण समोर आल्यानंतर भारतात एकच खळबळ उडाली होती. केंद्रीय तपास यंत्रणांनासुद्धा मोठा धक्का बसला होता. सध्या सीमा हैदरची तपास यंत्रणांकडून कसून चौकशी सुरू आहे. मात्र, आता अंजूचे प्रकरण समोर आले आहे. दोघांच्या प्रकरणात मात्र, ते खोटे बोलत असल्याची ही बाब समान दिसत आहे. दोन्हीही जणी सीमा ओलांडण्यासाठी अनेकदा खोटं बोलल्या. तर मग आपल्या पाकिस्ताने प्रियकराच्या भेटीसाठी अंजूने किती वेळा तेही कोणकोणत्या लोकांशी खोटं बोलली, ते जाणून घेऊयात. पहिले खोटे - घरातून निघताना म्हणाली - मित्राकडे जयपूरला जाते  अंजू ही 20 जुलैला आपल्या घरातून निघाली होती. तेव्हा तिला तिचा पती अरविंदने कुठे जात आहे, असे विचारले होते. मात्र, त्यावेळी तिने जयपूरला जात असल्याचे उत्तर दिले होते. पतीने पुढे विचारले की, जयपूरला काय काम आहे, तर आपल्या मैत्रिणीला भेटायला जात असल्याचे तिने सांगितले. मात्र, जयपूरच्या नावाने आपल्या पाकिस्तानातील प्रियकराला भेटण्यासाठी ती दिल्लीला निघून गेली होती. जयपूरमध्ये तिची कोणतीही मैत्रीण राहत नसल्याचे समोर आले आहे. दुसरे खोटे - व्हिडिओ कॉलमध्ये म्हणाली, मी लाहोरला आली अंजू राजस्थानहून पाकिस्तानला पोहोचून गेली होती. मात्र, ती पोहोचली, अशी भनकही तिने कुणाला लागू दिली नव्हती. मात्र, नंतर माध्यमांमध्ये, एक भारतीय महिला आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानला आली असल्याची बातमी आली. मग अरविंदला माहिती झाले की, ही महिला दुसरं कोणी नसून त्याची पत्नी अंजू आहे. त्यामुळे तौ हैराण झाला. मग त्याने पत्नी अंजूला व्हॉट्सअपवर कॉल केला, तर अंजूने त्याला लाहोरमध्ये आपल्या एका मैत्रिणीसोबत आली आहे, असे सांगितले. यावेळीही अंजू आपल्या पतीशी खोटे बोलली. ती 22 जुलै रोजी अंजूचा प्रियकर नसरुल्लाह हा अंजूला घेऊन पखनुनख्वाच्या दीर बाला भागातील त्याच्या पोहोचला होता. तिसरं खोटं झूठ - कंपनीत सांगितले गोव्याचा प्लान अंजू ही भिवाडीमध्ये एका खासगी कंपनीत नोकरी करत होती. तिने आपल्या प्लेसमेंट एजन्सीला सांगितले होते की, तिला आपल्या बहिणीला भेटण्यासाठी गोव्याला जायचे आहे. हे कारण देत तिने रजेसाठी अर्ज केला होता. मात्र, तिचा खरा प्लान हा पाकिस्तानला जाण्याचा होता. चौथं खोटं - पतीला म्हणाली - लग्न नाही करणार रविवारी अंजूने आपल्या पतीसोबत व्हॉट्सअपवर संवाद साधला. यावेळी तिचा पती अरविंदने तिला विचारले की, काय तु पाकिस्तानमध्ये लग्न करत आहेस? यावर तिने, असे काही नाही, हे उत्तर दिले. पाचवं खोटं - पाकिस्तानमध्ये म्हणाली - आम्ही लग्न करू माध्यमांनी दिलेल्या अहवालानुसार, अंजू ने पाकिस्तानातील स्थानिक माध्यमांना सांगितले की, ती नसरुल्लाहवर प्रेम करते आणि त्याच्यासोबत लग्नही करू इच्छिते. अंजूने दिलेल्या माहितीनुसार, नसरुल्लाहसोबत तिची मैत्री ही फेसबुकवर झाली होती. नंतर या मैत्रीचे रुपानंतर प्रेमात झाले. यानंतर तिने आपला पती आणि मुलगी हिला सोडून पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला. सहावं खोटं - अजू म्हणाली - माझा घटस्फोट झाला आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजूने पाकिस्तानातील स्थानिक पोलिसांना सांगितले की, तिचा घटस्फोट झाला आहे. तसेच ती नसरुल्लाहसोबत लग्न करू इच्छिते आणि याच कारणाने पाकिस्तानला आली आहे. सातवं खोटं - व्हिसामध्ये चुकीची माहिती पाकिस्तानला जाण्यासाठी आपल्या व्हिसा अर्जात अंजूने पाकिस्तानला जाण्याचे कारण लग्न असे सांगितले आहे. इतकेच व्हे तर तिने आपला व्यवसाय हॉटेल मॅनेजर असे सांगितले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या