कुशीनगर (उत्तर प्रदेश), 23 एप्रिल : संपूर्ण देशामध्ये कोरोनाचा फैलाव थांबवण्यासाठी लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. अशात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. किशोरवयीन मुलीचा अश्लिल व्हिडिओ बनविल्याची घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. पोलिस सूत्रांनी सांगितले की, पाथर्वा भागातील रहिवासी तरूणाने एका किशोरवयीन मुलीचा घरात स्नान करतानाचा गुप्त व्हिडिओ शूट केला होता. त्याने तिला ब्लॅकमेल करणं सुरू केलं होतं. ते म्हणाले की, तरुणीच्या आईने पोलिसात तक्रार देऊन कारवाईची मागणी केली. पोलिसांनी या तरूणाला अटक केली आणि तुरूंगात पाठविले. तुरूंगातून बाहेर आल्यानंतर या युवकाने अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे सांगितले. हे कळताच पीडित तरुणी आणि तिच्या आईने बुधवारी तरूणाविरूद्ध गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी केली. या प्रकरणी पाथर्वा पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षकांनी कारवाई केली जात असल्याचे सांगितले. लवकरच आरोपी युवकास अटक करुन तुरूंगात पाठविले जाईल. कोरोनाच्या संकटात दिलासादायक बातमी, मुंबईकरांनी करुन दाखवलं! पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पीडितेला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी तो तिला व्हिडिओवरून धमकावत आहेत. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत असून तरुणीला धीर देण्याचं काम सध्या सुरू आहे. दरम्यान, परिसरात अशा प्रकारे घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. शौचासाठी गेलेल्या किशोरवयीन मुलीचा सामूहिक बलात्कार, बनविला व्हिडिओ उत्तर प्रदेशातील सीतापूर गावात बंद शाळेमध्ये दोन किशोरवयीन आरोपींनीन सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्याचवेळी आरोपीच्या चार साथीदारांनीही घटनेचा व्हिडिओ बनविला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आणि साथीदारांचा शोध अधिक तीव्र केला आहे. राज ठाकरेंनी पत्रातून उद्धव ठाकरेंना दिला सल्ला, पाहा नेमकं काय म्हणाले