लखनऊ, 26 एप्रिल : उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगमध्ये एक धक्कादायक अशी घटना घडली आहे. एक नातू त्याच्या आजोबांच्या मृत्यूनंतर कबर खोदत होता. त्यावेळी नातवाचाच तिथे मृत्यू झाला. घटनेनंतर दोघांचे मृतदेह सोबतच दफन करण्यात आले. पोलिसांनी सांगितलं की, 80 वर्षांच्या मोहम्मद युसूफ यांचा हृदयविकाराने शुक्रवारी मृत्यू झाला होता. त्यांचा 40 वर्षांचा नातू सलीम मृतदेह घेऊन कब्रस्तानात पोहोचला आणि तिथे त्यालाही मृत्यूनं गाठलं. याबाबत मिळालेली माहिती अशी की, मोहम्मद युसूफ यांचा मृतदेह दफन करण्यासाठी सलीम काही मित्रांना सोबत घेऊन गेला होता. तिथं खड्डा खणत असताना त्याला घाम यायला लागला आणि अचान चक्कर येऊन पडला. सलीमच्या मित्रांनी त्याला डॉक्टरांकडे नेलं पण तिथं त्याला मृत घोषित कऱण्यात आलं. सलीमच्या मित्रांनी सांगितलं की, मृत्यूआधी सलीमने मजेत त्यांना म्हटलं होतं की इथं आणखी एक खड्डा खोदा कदाचित कोणाचा तरी मृतदेह येऊ शकतो. डॉक्टरांनी सांगितलं की, सलीमला रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. मित्रांनी सलीम आणि त्याच्या आजोबांना दफन केलं. हे वाचा : डोळ्यांमध्ये तब्बल 21 दिवस राहू शकतो कोरोना, धोकादायक व्हायरसबद्दल नवी माहिती फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या सलीमच्या मृत्यूचा धक्का त्याच्या मित्रांनाही बसला आहे. सलीमनं त्याच्या आजोबांसाठी कब्र खणली आणि स्वत:च त्यात पडला. शेवटी दोघांचाही मृतदेह शेजारी शेजारी दफन करण्यात आला. हे वाचा : किम जोंग यांच्या तब्येतीचं गूढ! आता खास ट्रेनचे सॅटेलाइट फोटो आले समोर संपादन - सूरज यादव