JOIN US
मराठी बातम्या / देश / Post Office : पोस्ट ऑफिसमध्ये महिलांसाठी नवी योजना! गुंतवणुकीवर मिळणार 7.5 टक्के व्याज

Post Office : पोस्ट ऑफिसमध्ये महिलांसाठी नवी योजना! गुंतवणुकीवर मिळणार 7.5 टक्के व्याज

केंद्रसरकारने महिलांच्या कल्याणासाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना सुरू केली असून यात गुंतवणूक करणाऱ्या महिलांना 7.5 टक्के व्याज मिळणार आहे.

जाहिरात

पोस्ट ऑफिसमध्ये महिलांसाठी नवी योजना! गुंतवणुकीवर मिळणार 7.5 टक्के व्याज

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

गया, 8 जुलै : केंद्र सरकारच्या अल्पबचत योजनांप्रमाणेच महिलांच्या कल्याणासाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना सुरू करण्यात आली आहे. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही एक प्रकारची वन टाईम बचत योजना असून या पोस्ट ऑफिस योजनेत अर्जदार महिला एकावेळी दोन लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकते. या योजनेअंतर्गत अर्जदार दोन वर्षांसाठी गुंतवणूक करू शकतील. या योजनेंतर्गत सरकारने जाहीर केलेला व्याज दर वार्षिक 7.5 टक्के इतका आहे. महिला सन्मान बचत पत्र योजनेच्या माध्यमातून अर्जदार महिलेने जमा केलेल्या रकमेवर सरकारकडून करात सूट दिली जाईल. या योजनेच्या माध्यमातून सर्व महिलांना गुंतवणूक करून कर सवलत मिळू शकते. कोणत्याही वयोगटातील महिला किंवा मुली या योजनेत गुंतवणूक करू शकतात. योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही.

गया विभागाचे वरिष्ठ पोस्टल अधीक्षक रासबिहारी राम म्हणतात की, या योजनेअंतर्गत अर्जदार दोन वर्षांच्या कालावधीसाठी पैसे जमा करू शकतात. योजनेतील दोन वर्षांच्या कालावधीत 7.5 टक्के व्याजदरानुसार पहिल्या वर्षी 15,000 रुपयांचा लाभ मिळेल आणि दुसऱ्या वर्षात पैसे जमा करण्यासाठी 16,125 रुपयांचा लाभ मिळेल. म्हणजेच दोन वर्षांत दोन लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर महिलांना योजनेअंतर्गत 31,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. राहुल गांधी शेतात राबले, शेतकऱ्यांनी घरून आणलं जेवण; असा होता मेन्यू या स्कीमची मॅच्युरिटी दोन वर्षांची असून ही एक शॉर्ट टर्म गुंतवणूक स्कीम आहे. ही योजना 31 मार्च 2025 पर्यंत सुरु राहणार आहे. महिला या योजने अंतर्गत एकच खात खोलू शकते. पोस्टल अधीक्षक यांनी सांगितले की, या योजनेअंतर्गत महिला कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये महिला सन्मान बचत प्रमाणपत्र खाते उघडू शकतात. गया पोस्टल विभागांतर्गत या योजनेअंतर्गत 135 खाती उघडण्यात आली असून सुमारे 38 लाख 18 हजार रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या