JOIN US
मराठी बातम्या / देश / लुधियानात गॅस गळतीने 9 जणांचा मृत्यू, 11 जणांवर उपचार सुरू

लुधियानात गॅस गळतीने 9 जणांचा मृत्यू, 11 जणांवर उपचार सुरू

लुधियानातील ग्यासपूरा भागात गॅस गळतीची घटना घडलीय. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लुधियाना, 30 एप्रिल : लुधियानात शेरपुर चौकात रविवारी सकाळी सुआ रोडवर एका कारखान्यात गॅस गळती झाली. यात किमान 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर आणखी काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. गॅस गळती सकाळी सव्वा सातच्या सुमारास सुरू झाल्याचं म्हटलं जात आहे. लुधियानाच्या एसडीएम स्वाती यांनी सांगितलं की, गॅस गळतीमुळे ही दुर्घटना घडलीय. एनडीआरएफचे पथक अडकलेल्या लोकांना बाहेर काढत आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे. यात ९ जणांचा मृत्यू झाला असून ११ जणांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रात गारपीट वादळी पावसाचे थैमान सुरूच, पुढचे 48 तास अतिमहत्वाचे गॅस गळती झालेल्या भागात ३०० मीटर परिसरातील लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. यामुळे परिसर रिकामा करण्यात आला असून इतरत्र हलवण्यात येत आहे. पोलिस आणि प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या