रायपूर, 18 फेब्रुवारी : छत्तीसगडची राजधानी रायपुरमधील एक महिला डॉक्टरचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी स्वत:ला महिला डॉक्टरचा प्रियकर असल्याचे सांगतो. आरोपीने डॉक्टरला फसवून अपहरण केले आणि तिच्यावर बलात्कार केला. महिला डॉक्टरचा आरोप आहे की आरोपीने बलात्काराचा व्हिडिओ तयार केला आहे. आरोपी पतीकडून घटस्फोट घेण्याची मागणी करीत असल्याचे तिने सांगितले. महिलेने याबाबत तक्रार दाखल केली असुन पुढील तपास सुरू आहे. रायपूरच्या पोलीस ठाण्यात महिलेने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडिता होमियोपॅथीची डॉक्टर आहे. आरोपी दिनेश सिंह कुशवारा यांनी महिला डॉक्टरला फसवले आणि एक दिवस तिचे अपहरण करीत बलात्कार केला. आरोपीने बलात्काराचा व्हिडिओही तयार केला आहे. आरोपी तो व्हिडिओ दाखवून महिलेला ब्लॅकमेल करीत होता. आरोपी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होता. महिलेने आपल्या पतीसोबत घटस्फोट घेण्यासाठी अर्जही केला होता. मात्र आरोपीकडून ब्लॅकमेलिंग सुरू होतं. शेवटी वैतागून महिलाने पोलिसांकडे तक्रार केली. अखेर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांकड़े दाखल केलेल्या तक्रारीनुसार आरोपी दिनेश सिंह कुशवाहा याने महिला डॉक्टरला हॉस्पिटलमध्ये गुंतवणूक करण्याचे सांगितले होते. आणि तिच्यासोबत जवळीक साधली. यानंतर काही कारणाने त्याने तिला घरी बोलावले व उत्तेजक द्रव्य देत तिच्यावर बलात्कार केला. यावेळी आरोपीने तिचा एक व्हिडिओ शूट केला. हा व्हिडिओ दाखवित त्याला ब्लॅकमेल केले. आरोपी महिला डॉक्टरला पतीपासून घटस्फोट घेण्यासाठी जबरदस्ती करीत होता. अन्य बातम्या